आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२९/०४/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख ०९ शके १९४७
दिनांक :- २९/०४/२०२५,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४९,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर ग्रीष्मऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- द्वितीया समाप्ति १७:३२,
नक्षत्र :- कृत्तिका समाप्ति १८:४७,
योग :- सौभाग्य समाप्ति १५:५४,
करण :- बालव समाप्ति ०७:२०, तैतिल २७:४९,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- मेष – भरणी,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०७नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:३८ ते ०५:१३ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५१ ते १२:२७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:२७ ते ०२:०२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:३८ ते ०५:१३ पर्यंत,
❀ दिन विशेष:
श्रीपरशुराम जयंती, चंद्रदर्शन (२०:५९ प.), मु. ४५ समर्घ,
————–
:
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख ०९ शके १९४७
दिनांक = २९/०४/२०२५
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
सामाजिक बांधिलकी जपाल. प्रेमाला -चालना मिळेल. कमी श्रमात कामे होतील. योग्य अनुमान काढाल. तारतम्याने वागा.
वृषभ
मित्र मदत करतील. खाण्याची काळजी घ्या. नोकरीत टिकून राहता येईल. इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका.
मिथुन
हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. नातेवाईकांची ये-जा वाढेल. विरोध मोडून काढता येईल. नव्या कामास आरंभकरा.
कर्क
भागीदारीतील कार्यात पुढाकार घ्याल. कौटुंबिक समस्या सोडवाल. वाटाघाटीत तणाव होईल. नोकरी टिकवा. वेळेला महत्त्व द्या.
सिंह
जोडीदाराचा वरचष्मा राहील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. सहकान्यांची नाराजी पत्करू नका. चारचौघांत कौतुक होईल.
कन्या
एकलकोंडेपणा दूर होईल. सर्वांशी सौजन्याने वागा. धार्मिक कामात पुढाकार घ्याल. परोपकाराचे महत्त्व पटवून द्याल.
तूळ
धंद्यात मोठा फायदा होईल. घरातील कामे होतील. आनंदी राहाल. आर्थिक व्यवहारात सतर्क राहा. शैक्षणिक कामे होतील.
वृश्चिक
आपल्या आत्मविश्वासात भर पडेल. धंद्यात वाद तसेच अरेरावी करू नका. सामाजिक कार्याला हातभार लावाल.
धनु
मनाप्रमाणे घटना घडतील. वाटाघाटीचा प्रश्न मार्गी लावाल. चौकसपणे विचार करावा. कौटुंबिक वातावरण बिघडू देऊ नका.
मकर
वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. स्वतःच्या मर्जीने वागाल. कुणालाही कमी समजू नका. वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल.
कुंभ
कार्यपद्धतीचे कौतुक केले जाईल. भावंडांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठांशी मिळते जुळते धोरण स्वीकारावे. धंद्यात वाढ होईल.
मीन
कौटुंबिक आनंद वाढेल. गैरसमजापासून दूर राहा. धार्मिक गोष्टींची आवड दर्शवाल. आपली साहित्याची आवड जोपासाल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर