अकोले/प्रतिनिधी- अकोले तालुक्यातील सत्यनिकेतन संस्थेच्या कातळापूर येथील नानासाहेब विठोबा देशमुख सर्वोदय विदया मंदिर विदयालयात नवनियुक्त मुख्याध्यापक तसेच इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विदयार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला.
येथील विदयालयातील मुख्याध्यापक शिवाजी नरसाळे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने सेवाजेष्ठतेनुसार सर्वोदय विदया मंदिर राजूर येथील उपप्राचार्य बादशहा ताजणे यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा विदयालयात शाल, गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
विदयालयाचा इयत्ता दहावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल शंकर टक्के लागला. या परीक्षेत मयुर मधुकर पटेकर(८९.८०%), गौरव संतोष रोकडे( ८२.४०%),वैभव सोमनाथ कोकरे(७८.६०%) गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक पटकाविला.तर राहूल बाळु कातडे(६८.६०%) चतुर्थ क्रमांक, रोहिदास कानिफनाथ कोकरे(६८%) पाचवा क्रमांक, शुभम अनिल शिंदे (६६.८०%) सहावा क्रमांक मिळविला. या गुणवंत विदयार्थ्यांचा तसेच पालकांचा यावेळी फेटा, शाल, गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी मुख्याध्यापक शिवाजी नरसाळे, नवनिर्वाचीत मुख्याध्यापक बादशहा ताजणे, संचालक विजय पवार,प्रा.संतोष कोटकर,प्रा.शरद तुपविहीरे,प्रा.अमोल तळेकर,मार्गदर्शक शिक्षक गोरक्ष मालुंजकर,श्रीकांत घाणे, भानुदास विटकर, अनिल पवार तसेच धनंजय मोहुंडूळे,मिना गाडे, अनिता जंबे यांसह पालक मधुकर पटेकर,अंजना रोकडे, मंगल शिंदे,वनिता कोकतरे आदी उपस्थित होते. मार्गदर्शक शिक्षक व गुणवंत विदयार्थी आदींचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख, सचिव टि.एन. कानवडे, कोषाध्यक्ष विवेकजी मदन, संचालक मिलिंदशेठ उमराणी, विजय पवार, अशोक मिस्त्री, विभागीय अधिकारी प्रकाश महाले, माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर तसेच सर्व संचालक, माजी मुख्याध्यापक शिवाजी नरसाळे, नवनियुक्त मुख्याध्यापक बादशहा ताजणे यांसह पालक, ग्रामस्थांनी अभिनंदन केले तसेच भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गोरक्ष मालुंजकर यांनी केले. तर श्रीकांत घाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.