पुणे मेट्रोतील कंत्राटी कामगारांचा भव्य मेळावा संपन्न!

पुणे दि२९-पुणे मेट्रोमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांचा भव्य मेळावा दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी शनिवार पेठेतील विश्वकर्मा भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्यात नागपूर/पुणे मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघ रजिस्टर नंबर( एन पी जी 5728 ) भारतीय मजदूर संघ संलग्न यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले की, संघटनेचा मुख्य व एकमेव हेतू राष्ट्रहित, उद्योगहित आणि कामगारहितासाठी अखंड संघर्ष करणे हा आहे. महाराष्ट्र व देशभरातील विविध शहरात मेट्रो चा विस्तार वाढत आहेत. तसेच कामगारांच्या न्याय्य हक्कां मागण्यां करितां मेट्रोतील कंत्राटी कामगारांनी भारतीय मजदूर संघाच्या सोबत एकत्रित होवून न्याय हक्कांसाठी संघर्ष करावा असे मनोगत अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केले आहेत.
पुणे मेट्रोमध्ये कार्यरत असलेल्या 1000 पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांनी अलीकडेच या संघटनेचे सभासदत्व स्वीकारले आहे.

या भव्य मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नागपूर/ पुणे मेट्रौ रेल कंत्राटी कर्मचारी संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ)महेश खांदारे (अध्यक्ष) होते. त्यांच्या समवेत प्रमुख पदाधिकारी म्हणून महामंत्री नितीन कुकडे , संघटन सचिव प्रांजल चौधरी , भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ, सागर पवार, श्रीमती बेबी राणी डे , पुणे विभागाचे उपाध्यक्ष राम सुरवसे, कार्याध्यक्ष यश निंबाळकर, संघटन सचिव राज शेलार, निकिता दंडवते, जावेद शेख, हरिश गोयर, प्रतिक रेणुकर, डेपो प्रमुख आदेश होळकर, रवींद्र वाघोले, तसेच सदस्य प्रियंका जगताप, रोहित साळुंखे, सिद्धत चौरे, विलीयम अरुलादास, कैलास मोरे, कैलास चौगुले, गौरी साळुंखे, हलिमा योगिता देवने, गोरख शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अध्यक्ष महेश खांदारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “पुणे मेट्रोतील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देणे, वेतन वाढ व इतर महत्वपूर्ण प्रश्नांवर वरिष्ठ व्यवस्थापनाशी चर्चा करून सन्मानजनक तोडगा काढण्यात येईल.”
या मेळाव्यात उपस्थित सर्व कामगारांनी एकात्मतेचा आणि संघर्षाचा निर्धार करत ठाम संदेश दिला की, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कामगारांच्या हक्कासाठी अखंड संघर्ष केला जाईल.

कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष मोहिम राबविणे थकीत वेतन, भविष्य निर्वाह निधी, बोनस, मेडीक्लेम व अन्य हक्कांसाठी प्रभावी पाठपुरावा करणे अन्यायकारक कारवाईला तीव्र विरोध करणे नवीन कामगारांना मार्गदर्शन व संरक्षण प्रदान करणे नागपूर मेट्रोप्रमाणे पुणे मेट्रो कामगारांसाठी सेवा शर्ती निश्चित करणे व अंमलबजावणी करणे असे निर्णय यावेळी घेण्यात आले
भारतीय मजदूर संघ संघटन सचिव श्री. बाळासाहेब भुजबळ यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितले, “आपली लढाई केवळ कामगार कल्याणासाठी आहे; नोकरीत सातत्य, जाँब गॅरेंटी असणे महत्वपूर्ण आहे. कोणत्याही आम्ही अखंडपणे कामगार हक्कांसाठी लढा देत राहू.” मेळाव्याचा समारोप “भारतीय मजदूर संघ जिंदाबाद! कामगार एकता जिंदाबाद!” या गगनभेदी घोषणांनी झाला.