वाडा नागरी सहकारी पतसंस्थेच्या कुडूस येथील नवीन शाखेचे 1 मे ला उद्घाटन!

पालघर- वाडा नागरी सहकारी पतसंस्था लि. या संस्थेच्या
कुडूस येथील नवीन शाखेच्या उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम गुरुवार, दि. ०१ मे २०२५ रोजी स. १०. ३० वा. करण्याचे योजले आहे.
अमृतेश्वर शॉपिंग कॉम्प्लेक्स, गाळा नं.१३ व १४, पहिला मजला, कुडूस, ता.वाडा, जि. पालघर येथे होणाऱ्या कार्यक्रमास
श्री. हेमंतजी सवरा साहेब खासदार, पालघर लोकसभा यांचे हस्ते या शाखेचे उदघाटन होणार असून यावेळी
प्रमुख पाहुणे श्री.अशोक विठ्ठल दुगाडे . श्री. श्रीकृष्ण वाडेकर साहेब श्री. शिरीष शिवाजी कुलकर्णी
(उपनिबंधक सहकारी संस्था, पालघर).श्री. विष्णुपंत कोंडीबा बोबडे (सहकार भारती वरिष्ठ कार्यकर्ता) आदि मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत

तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहुन आमचा आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन. श्री. सुभाषराव खासनिस( सहकार भारती कार्यकर्ता) ,श्री. राजेंद्र गणपत कोंगील (,सरपंच, ग्रामपंचायत कुडूस) श्री. दिलीप दत्तात्रेय म्हात्रे (संस्थापक – अध्यक्ष, वाडा नागरी सहकारी पतसंस्था, वाडा) सर्व सन्माननिय संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांनी केले आहे
:::