इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि ०२/०५/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १२ शके १९४७
दिनांक :- ०२/०५/२०२५,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५०,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर ग्रीष्मऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति ०९:१५,
नक्षत्र :- आर्द्रा समाप्ति १३:०४,
योग :- धृति समाप्ति २७:२०,
करण :- कौलव समाप्ति २०:२८,
चंद्र राशि :- मिथुन,
रविराशि – नक्षत्र :- मेष – भरणी,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी १०:५० ते १२:२६ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:३९ ते ०९:१४ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:१४ ते १०:५० पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:२६ ते ०२:०२ पर्यंत,

❀ दिन विशेष:
श्री आद्य शंकराचार्य जयंती, श्रीरामानुजाचार्य जयंती, घबाड १३:०४ नं., षष्ठी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १२ शके १९४७
दिनांक = ०२/०५/२०२५
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
सर्वांना गोडीने आपलेसे कराल. कामाचा ताण जाणवेल. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. मित्रांशी वाद वाढवू नयेत.

वृषभ
आपले विचार कौशल्याने मांडाल. तुमच्यातील चतुरता दिसून येईल. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. अचानक लाभ संभवतो.

मिथुन
मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. कामात अधिकारी वर्गाची मदत मिळेल. भागिदारीतून चांगला लाभ संभवतो. कामात कसलीही कसूर करू नका. वातविकाराचा त्रास जाणवू शकतो.

कर्क
स्त्रियांशी मैत्री कराल. खेळकरपणे दिवस घालवाल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. कामाचा उरक वाढवावा लागेल. पोटाची किरकोळ तक्रार जाणवेल.

सिंह
काही तडजोडी स्वीकाराव्या लागतील. कलेला योग्य दाद मिळेल. सामाजिक कामात सहभाग घ्याल. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका.

कन्या
कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुशलपणे आपले मत पट‍वून द्याल. उगाच शिस्तीचा बडगा आमलात आणू नये. प्रवासाचा योग येईल. अपचनाचा त्रास संभवतो.

तूळ
भावंडांची काळजी लागून राहील. भागीदारीत अधिकाराने वागाल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. काहीसा मानसिक ताण जाणवेल.

वृश्चिक
घरगुती प्रश्न चिघळू देवू नयेत. चांगला व्यावसायिक लाभ होईल. काहीसा मानसिक ताण जाणवेल. जोडीदाराचे बोलणे लाडिक वाटेल. चारचौघांत तुमचे कौतुक केले जाईल.

धनू
दिवस सत्कारणी लावाल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. जवळचे नातेवाईक भेटतील. जुन्या प्रसंगांना उजाळा देण्यात येईल. प्रवास जपून करावा.

मकर
तुमच्या बोलण्याला धार येईल. मागच्या पुढच्या गोष्टींचा विचार करणे अपरिहार्य आहे. तुमच्या जवळील ज्ञानाचा सदुपयोग होईल. आर्थिक गोष्टींचा पुनर्विचार करावा.

कुंभ
रागावर नियंत्रण ठेवा. अती महत्त्वाकांक्षा चांगली नाही. तुमच्यातील धाडस वाढीस लागेल. उत्साहाने कामे पूर्ण कराल. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

मीन
डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. गैरसमजुतीमुळे त्रास संभवतो. कामातील चलबिचलता टाळावी. व्यावसायिक बाबींचा सखोल विचार करावा. जबाबदारी योग्य रीतीने पार पाडाल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button