.राज्यस्तरीय ‘ठेवूया मुक्या पक्षांना दाणा पाणी, पाठवूया आनंदाच्या सेल्फी फोटो’ या स्पर्धेला मोठा प्रतिसाद!

.
सोलापूर : येथील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ‘ठेवूया मुक्या पक्षांना दाणा पाणी, पाठवूया आनंदाच्या सेल्फी फोटो’ ही स्पर्धा आयोजित केले होते.
या स्पर्धेत राज्यभरातून व जिल्ह्यातून तब्बल ३५० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. सुरवातीला जाहीर केल्याप्रमाणे लकी ड्रॉ काढण्यात आले होते. मुंबईच्या सौमिका मेरुगूमिल्ली हिने प्रथम क्रमांक मिळवत नेकलेस व कर्णफुलच्या मानकरी ठरल्या. सामाजिक कार्यकर्ते शेखर इगे यांच्या वतीने हे बक्षीस देण्यात आले. ‘ठेवूया मुक्या पक्षांना दाणा पाणी, पाठवूया आनंदाच्या सेल्फी फोटो’! या अनोख्या स्पर्धेत राज्य, शहर व जिल्ह्यातून जवळपास ३५० पेक्षाही जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला.
सोलापूर महापालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी लक्ष्मण दोंतूल यांच्या तर्फे देण्यात आलेल्या द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विजेते ठरले अकलूजचे सुहास कुलकर्णी. याबरोबर तृतीय क्रमांकाचे बक्षीस मोहोळ, अनगर येथील उज्वला गाढवे तर, सोलापूरच्या मीनाक्षी कोळी या चौथ्या क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या. परगावीच्या विजेत्यांना कुरियरद्वारा पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी दिले.
व्यवसायिक राजकुमार गुजर तर्फे दिले जाणा-या उत्तेजनार्थ प्रथम बक्षीस ‘नांदेड’ येथील राजेश्वर कनकमवार हे किचन भांडीचे विजेते ठरले. उत्तेजनार्थ द्वितीय बक्षीस सोलापूरातील ‘केगाव’ येधील किरण जाधव हे ‘डिनर सेट’चे मानकरी ठरले. तर, उत्तेजनार्थ टिफीन बॉक्सचे विजेत्या ठरल्या सोलापूरच्या लक्ष्मी शेरला. गुरुवारी सकाळी लहान मुलांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आले होते. संध्याकाळी बक्षीस वितरित करण्यात आले आहे. हेमा मैलारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मेघा इट्टम यांनी प्रास्ताविक करुन विजेत्यांची घोषणा केल्या. गीता भूदत्त यांनी आभार मानले. यावेळी सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम, हेमा मैलारी, पल्लवी संगा, पद्मा मेडपल्ली, गीता भूदत्त, दयानंद कोंडाबत्तीनी, किशोर व्यंकटगिरी, वैकुंठम् जडल, लक्ष्मण दोंतूल व राजकुमार गुजर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.
फोटो ओळ – श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ‘ठेवूया मुक्या पक्षांना दाणा पाणी; पाठवूया आनंदाची सेल्फी फोटो’! या स्पर्धेतील विजेत्या सोबत लक्ष्मण दोंतूल, राजकुमार गुजर, मेघा इट्टम, हेमा मैलारी, पल्लवी संगा, पद्मा मेडपल्ली, गीता भूदत्त, दयानंद कोंडाबत्तीनी, किशोर व्यंकटगिरी, वैकुंठम् जडल.