पांजरे येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व यश !

अकोले /प्रतिनिधी
फेब्रुवारी-२०२५ मध्ये इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आल्या .या परीक्षेत पांजरे ता अकोले येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश मिळवले .
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत अकरापैकी आठ विद्यार्थी पात्र झाले. तर इयत्ता आठवीतील एका विद्यार्थिनीन अभूतपूर्व यश संपादन केले असून,अकोले तालुक्यात विद्यालयाचा माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक आला आहे.एकूण इयत्ता पाचवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ७३टक्के एवढी आहे .
अतिदुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची तळमळ लक्षात घेता राघू दादा जाधव यांनी या विद्यालयाची मुहूर्तमेढ १९९९ मध्ये रोवली. या विद्यालयाचे कृतीशील उपक्रमशील मुख्याध्यापक संजय उकिर्डे यांचेही उत्कृष्ट व्यवस्थापन या कामी यशस्वी ठरले आहे
.
उत्तुंग व अभूतपूर्व यश संपादन करणारे विद्यार्थी १) उघडे अनिकेत गणपत २)उघडे दिलीप भाऊ ३)उघडे ईश्वर सुधाकर ४) उघडे मंगळी राम बाळू ५ )उघडे पवन अशोक ६) उघडे सुरज मधुकर ७ )उघडे वर्षा सुरेश ८) उघडे मोहिनी चंद्रकांत इयत्ता ८वी १)कुमारी गांगड आरती दशरथ मार्गदर्शक शिक्षक व शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले. !
———/—–