इतर

जी यस महानगर बँक निवडणूक अध्यक्षा श्रीमती सुमनताई शेळके यांच्या पॅनल चा प्रचाराचा नारळ फुटला!

दत्ता ठुबे

पारनेर – जी यस महानगर बँक संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक रविवार दि १ जून रोजी होत असून या निवडणुकीसाठी विदयमान अध्यक्षा श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके यांच्या संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके व श्रीमती सुमन गुलाबराव शेळके यांच्या पॅनलचा प्रचाराचा नारळ मुंबईतील कॉटन ग्रीन येथील श्रीराम मंदिरात मोठया संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांच्या हस्ते फोडण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मुंबई,वाशी,ससूनडाॅक,कळंबोली,पुणे व पारनेर येथील महानगर बँकेचे सभासद तसेच अर्ज दाखल केलेले उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रथम श्रीमती सुमनताई यांच्या हस्ते श्रीरामाची विधीवत पूजा झाली. त्यानंतर प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर सभासदांना निवडणूक निमित्ताने विनम्र आवाहन परिपत्रकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. तद्नतंर उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.

लालबागचा राजा श्रीगणेशाचे दर्शन घेऊन मसाला गल्लीतून अध्यक्षा श्रीमती सुमनताईं सह उमेदवार आणि प्रचारक यांनी भेटी व पत्र वाटपासाठी पदयात्रे व्दारे प्रारंभ केला.ही पदयात्रा गणेशगल्ली , मसाला गल्ली, चिवडा गल्ली, आला.बी.एस्. मार्ग ते बँकेच्या मुख्य कार्यालयापर्यत येऊन समाप्त झाली.
या वेळी विदयमान अध्यक्षा सुमनताईंची कृतज्ञता म्हणून भर उन्हात आणि गर्दीत विचारपूस करीत होते. सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहबने हम को यह दिन दिखाए ! ” हे डोळ्यांत आनंद अश्रू आणून व्यक्त होत होती. हे भावनिकतेचे चित्र बरेच काही सांगून जात होते.


बँकेच्या स्थापनेपासून संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके हे होत असलेल्या प्रत्येक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये मुंबईतील याच कॉटन ग्रीनमधील श्रीराम मंदिरात सभासदांच्या हस्ते व उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करीत होते.
आज जरी सॉलिसिटर गुलाबराव शेळके आपल्यात नसले तरी त्यांची ही जुनी परंपरा बँकेच्या अध्यक्षा व पॅनल प्रमुख श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके पुढे चालू ठेवत आल्या आहेत.एक प्रकारे त्यांच्या वतीने दिवंगत गुलाबराव शेळके यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button