आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१३/०५/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २३ शके १९४७
दिनांक :- १३/०५/२०२५,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५३,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर ग्रीष्मऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति २४:३६,
नक्षत्र :- विशाखा समाप्ति ०९:०९,
योग :- परिघ अहोरात्र,
करण :- बालव समाप्ति ११:३४,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- मेष – कृत्तिका,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. ०९नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:४० ते ०५:१७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:४९ ते १२:२६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:२६ ते ०२:०३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:४० ते ०५:१७ पर्यंत,
❀ दिन विशेष:
इष्टि,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २३ शके १९४७
दिनांक = १३/०५/२०२५
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
कौटुंबिक जबाबदारी वाढेल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. खर्चाचा आकडा निश्चित करा. मित्रांशी मतभेद संभवतात. जमिनीच्या कामातून लाभ मिळेल.
वृषभ
हौस मौज करण्यात खर्च वाढू शकतो. प्रत्येक गोष्टींचा उत्तम आस्वाद घ्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची इतरांवर चांगली छाप पडेल. सर्वांना लाघवीपणे आपलेसे कराल. आवडत्या कामात दिवस घालवाल.
मिथुन
पारदर्शीपणे वागणे ठेवा. झोपेची तक्रार जाणवेल. बाह्य गोष्टींचे आकर्षण वाढू शकते. मनातील निराशा दूर सारावी. फसवणुकीपासून सावध रहा.
कर्क
अधिकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नवीन संबंध प्रस्थापित केले जातील. जवळचे मित्र मंडळी भेटतील. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.
सिंह
कामानिमित्त प्रवास करावा लागेल. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. हितशत्रूंचा विरोध मावळेल. हातातील कामात यश येईल.
कन्या
मानसिक गोंधळाला बळी पडू नका. कौटुंबिक गोष्टीतून मार्ग काढता येईल. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. परोपकाराची जाणीव ठेवाल.
तूळ
सासुरवाडीची मदत मिळेल. सांपत्तिक दर्जा सुधारला जाईल. अचानक धनलाभ होईल. कामातून अनपेक्षित लाभ होईल. पत्नीची नाराजी दूर करावी.
वृश्चिक
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराबाबत आकर्षण वाढीस लागेल. कामासंबंधी नवीन योजना आखाव्यात. भागिदारीतून चांगला लाभ होईल. कौटुंबिक सुख-शांती जपावी.
धनू
तुमच्यातील अंगीभूत कलागुणांना वाव द्यावा. आळस झटकून कामाला लागावे. ऐषारामाच्या वस्तूंकडे ओढ वाढेल. भावंडांशी मतभेद संभवतात. कामातून आनंद व समाधान
मकर
शांत व संयमी विचारांची आवश्यकता. व्यवहारी भूमिका ठेवून वागाल. सर्वांशी सर्जनशीलतेने वागण्याचा प्रयत्न कराल. छंद जोपासण्यात वेळ घालवाल. मित्र परिवारात लाडके व्हाल.
कुंभ
सर्वांना मनापासून मदत कराल. जवळचे मित्र जमवाल. दिवस गप्पा-गोष्टीत व मजेत घालवाल. कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
मीन
मित्रांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करा. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. व्यापाराच्या नवीन योजना आखल्या जातील. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर