आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१५/०५/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २५ शके १९४७
दिनांक :- १५/०५/२०२५,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५४,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर ग्रीष्मऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति २८:०३,
नक्षत्र :- ज्येष्ठा समाप्ति १४:०८,
योग :- शिव समाप्ति ०७:०२,
करण :- वणिज समाप्ति १५:११,
चंद्र राशि :- वृश्चिक,(१४:०८नं. धनु),
रविराशि – नक्षत्र :- वृषभ – कृत्तिका,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- ज्येष्ठा वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०२:०३ ते ०३:४० पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०५:५७ ते ०७:३४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:२६ ते ०२:०३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०३ ते ०३:४० पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:१७ ते ०६:५४ पर्यंत,
❀ दिन विशेष:
अगस्ति लोप, भद्रा १५:१९ नं. २८:०३ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २५ शके १९४७
दिनांक = १५/०५/२०२५
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
आलेला दिवस तुम्हाला आज आव्हान म्हणून स्वीकारावा लागेल. एकत्रित रित्या अनेक गोष्टी कराव्या लागतील. अर्थात दिवसाला सोनेरी किनार सुद्धा आहे. अचानक धनलाभाची शक्यता दिसते आहे.
वृषभ
रसिक असणारी आपली रास आज कलेमध्ये विशेष प्राविण्य मिळवाल. आपल्या आयुष्यात घडलेल्या सुखद घटना आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर कराल. कोर्टामध्ये यश मिळेल.
मिथुन
सर्दी, फुफ्फुसाशी निगडित आजार, मानसिक ताणतणाव अशा गोष्टींपासून आज स्वतःला जपणे गरजेचं आहे. योग्य वेळी आपल्या कनिष्ठांची मदत घ्या. ते फायदेशीर ठरेल.
कर्क
भावनेने केलेल्या गोष्टींना कायमच लवकर यश मिळते. आपण करत असलेल्या गोष्टी नेहमीच मन लावून करता. अगदी उपासना, सहृदयता, झोकुन देऊन काम कराल. आपल्या कामाचा आयाम वाढेल. दिवस शुभ आहे.
सिंह
सरकारी नोकरी, नोकरदार, सरकारी ओळखी मधून फायदा होईल. घरी चांगल्या लोकांची ऊठबस होईल. कदाचित आपण सुद्धा उदार मनाने इतरांना मदत कराल. दिवस संमिश्र आहे.
कन्या
बौद्धिकदृष्ट्या पुढे नेणारा आजचा दिवस आहे. ज्या लोकांना अशी बुद्धिमत्तेची झाक आहे अशाच लोकांची आपले पटते. नव्याने परिचय होतील. दिवस चांगला आहे.
तुळ
सोने खरेदी, अलंकार यासाठी दिवस आपल्याला खरंच सोन्याची संधी घेऊन आलेला आहे. गुंतवणूक चांगल्या प्रकारे होईल. व्यवहारामधून फायदा होईल
वृश्चिक
अवघड गोष्टी सोप्या करायच्या मागे धावाल. खूप कामे येतील आणि करतही राहाल. पण एकूणच आनंदासाठी जगणे होईल. स्वतःचा आत्मविश्वास वाढेल. दिवस चांगला आहे.
धनु
परदेशी जाण्याचे योग आहेत. याच्यासाठी नियोजन करा. बंधन योग, मनस्ताप, महत्त्वाच्या ऐवज सांभाळणे असे आवाहनात्मक गोष्टींना सामोरे जावे लागेल. दिवस संमिश्र आहे.
मकर
प्रेमामध्ये स्पष्ट बोलणे आज थोडे अडचणीचे ठरेल. तसेही शब्द मोजके आणि मोजून बोलणारी, तोलून मापून बोलणारी आपली रास आहे. सावधगिरीने पावले उचला. मात्र मैत्रीचे आणि यशाचे लाभ पदरात पडतील.
कुंभ
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे असा संदेश सहकान्यांना द्याल. तुमच्या कामामुळे इतर भारावून जातील. बढतीचे योग आहेत. सामाजिक उपक्रमात अग्रेसर रहाल.
मीन
श्वासे श्वासे दत्त नाम” असा दिवस घालवणे आज फायद्याचे ठरेल. उपासनेला विशेष महत्त्व द्याल . साधेपणामुळे आपले नुकसान होत नाही. भाग्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर