जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सांगता सोहळा’
🌹 जुन्नर, अकोले, संगमनेर, पारनेर, आंबेगाव, खेड व मावळ तालुक्यातील जनतेला विनम्र आवाहन 🌹
जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सांगता सोहळा’ 🌹
सन्माननीय बंधु/भगिनींनो,
‘जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सांगता सोहळा’ कार्यक्रम जुन्नर तालुक्यातील ओतूर नगरित रविवार दिनांक:-१८.०५.२०२५ ते रविवार दिनांक:-२५.०५.२०२५ या कालावधीत ‘न भूतो न भविष्यती’ असा मोठ्या प्रमाणात ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.सदर कार्यक्रमाची सुरुवात शनिवार दिनांक:-१७.०५.२०२५ रोजी दुपारी ३.००वाजता भव्य दिव्य शोभा यात्रेने होणार आहे.
तत्पूर्वी जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज यांच्या पादुका देहू येथून हेलिकॉप्टर मधून जुन्नर तालुक्यातील शिव जन्मभूमीत आणण्यात येतील तद्नंतर शिवनेरी किल्ला, जुन्नर, लेण्याद्री गणपती,ओझर गणपती,रंगनाथ महाराज,आणे,रेडा समाधी,आळे,या ठिकाणी हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येईल.
नंतर श्री.संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची बैलजोडी असलेल्या रथातून भव्य मिरवणूक ओतूर नगरित काढण्यात येईल.मिरवणूकीचे वैशिष्ट्ये ३७५ ध्वजधारी पुरुष,३७५ तुळशी धारी महिला,३७५ कळशी धारी महिला ,३७५ टाळकरी,३७५ तुकाराम नावाचे वारकरी,३७५ चोपदार,३७५मृदुंगमणी,आदि.सहभागी होणार आहेत.
सदर मिरवणूक मोनिका चौक,ओतूर येथून सुरू होईल.
पुढे हायवेने नविन एस.टी.स्टॅंडवरुन ब्राह्मणवाडा चौक,जुने एस.टी.स्टॅंड,नगर वेस(पांढरी मारुती मंदिर),बाजार पेठ मार्गे रोहकड वेशीपर्यंत जाईल.पुढे पादुका असलेला रथ गुरू -शिष्य भेटीसाठी चैतन्य महाराज मंदिरात जाईल व परत अश्व गोल रिंगण होईल त्या ठिकाणी येईल.तत्पुर्वी मिरवणूकीत सहभागी झालेली सर्व पथके गोल रिंगण होईल त्या ठिकाणी जातील.
गोल रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता हा.भ.प.श्री.तुळशीराम महाराज सरकटे यांचे प्रवचन किर्तन मंडपात संपन्न होईल.त्यानंतर अन्न प्रसाद होईल.
असा भव्य दिव्य कार्यक्रम ओतूर नगरिच्या जनतेला पहायला मिळणार आहे. हे आपले भाग्यच आहे.यापूर्वी असा कार्यक्रम ओतूर नगरित झालेला नाही.
ओतूर नगरीतील सर्व जनतेला विनम्र आवाहन करण्यात येते की,हा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी सर्व जनतेने त्या दिवशी आपला सर्वांचा उत्सव (सन) आहे हे समजून आवर्जून उपस्थित रहावे,तसेच ओतूर नगरिच्या नोकरी /धंदा/व्यवसाय इत्यादी साठी मुंबई/पुणे/नाशीक व इतर शहरात असलेल्या नागरिकांनी यात्रोत्सव समजून आवर्जून उपस्थित रहावे,ही विनंती.
आपले विनीत,
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सांगता सोहळा’ समिती, ओतूर.