महिला कामगारांच्या करिता आरोग्य शिबीर संपन्न

पुणे – भारतीय मजदूर संघाचे संस्थापक श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांचा 14 आक्टोबर स्मृतिदिनानिमित्त अॅम्युनेशन फॅक्टरी खडकी येथे महिलांच्या करिता आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते.
या वेळी महिलां च्या करिता नियमीत तपासणी, आरोग्य चाचणी, स्लाईड शो, वैद्यकीय मार्गदर्शन, ई माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच नोकरी करणाऱ्या महिलांनी शारीरीक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमीतपणे व्यायाम, आवश्यक ते तपासणी करावी असे प्रतिपादन डाॅ प्रेरणा कुलकर्णी (नाग फौंडशन) यांनी व्यक्त केले आहे.
या वेळी वुमेन वेलफयर च्या अध्यक्ष श्रीमती मिलन हजारी, श्रीमती चेतना श्री, डाॅ प्रझा चव्हाण, भारतीय मजदूर संघ महिला विभाग प्रमुख श्रीमती वंदना कामठे, उपस्थित होते.
या वेळी सुत्रसंचालन श्रीमती वर्षा शेळकंदे यांनी प्रास्ताविक केले व कल्याणी बडगुजर यांनी केले.
कार्यक्रम चे नियोजन भारतीय संरक्षण कामगार संघांचे अध्यक्ष गणेश टिंगरे, सरचिटणीस संदीप वाळके , प्रमिला पठारे, शांताताई लांडगे, सीमा चौधरी, अश्विनी कांबळे, चैत्राली पवार यांनी केले आहे.