आदिवासी मुलीचे अपहरण व लैगिक अत्याचार! पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप

नाशिक- हरसूल पो. स्टे.मधील गुन्हा र. नं. १/२०२५ नुसार आरोपी शिवा परदेशी (पुर्ण नाव माहित नाही) याने बोरीचा पाडा येथील १७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीच बळजबरीने अपहरण केले आहे. आरोपीने गेल्या ५ महिन्यांपासून त्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार करून तीचे सर्वांगाने शोषण केले असल्याची फिर्याद पिडीतेचे वडील नामदेव किसन चिखले यांनी हरसूल पो. स्टे. मध्ये दिली आहे.
वारंवार पो. स्टे. ला चकरा , हेलपाटे मारूनही आरोपीला अटक झालेली नाही. यानंतर तक्रारदाराने मा. पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रा) तसेच महिला सुरक्षा विभाग, नाशिक (ग्रा) पोलीस, सायबर सेल गुन्हे नाशिक ग्रामीण शाखा, मा. जिल्हाधिकारी नाशिक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले आहे.

त्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार यांचेकडे ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे.परंतु पोलीसांनी आरोपीच्या भावाबरोबर अर्थपूर्ण देवाण-घेवाणीतून आरोपीला मोकाट सोडलेले आहे. हि बाब अतिशय गंभीर असून अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी नाशिक यांची भेट घेऊन आरोपीला तात्काळ अटक करावी. आरोपीच्या विरोधात पोक्सो तसेच अनु. जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रोसिटी) अन्वये गुन्ह्याची नोंद करून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केलेली आहे. तसेच याप्रकरणी पोलीस प्रशासनाने आरोपीला मदत केली असल्याने त्यांनाही सह आरोपी करून संबंधित पोलीसांना सेवेतून कायमचे बडतर्फ करण्याची मागणी केली आहे…अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलनाचा ईशारा निवेदनाद्वारे दिलेला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी या प्रकरणी विशेष लक्ष घालून आरोपीला तात्काळ अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. निवेदनावर समितीचे मुख्य निमंत्रक : ऍड. राहूल विष्णू तूपलोंढे, ऍड. निलेश सोनवणे, दिलीप लिंगायत, रोहिणी जाधव, गणेश रणधीर, मंगल भांगरे,रावजी साप्ते,चंदर साप्ते, जिजाबाई निंबारी,हरी अर्जून भोये,रामदास पांडू भोये, शांताबाई साप्ते, ताराबाई साप्ते, पारीबाई चंदर साप्ते, रामदास चिखले,मीराबाई रामदास चिखले, आदींसह पदाधिकारी