ब्राम्हणवाडा गावचे भूमिपुत्र जवान संदीप गायकर यांना वीरमरण!

अकोले प्रतिनिधी:
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावाचे वीर भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांनी भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत असताना जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी वीरमरण आले
आज पहाटे दहा जणांची तुकडी सीमेवर सैन्यांत आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर दहशत वाद्यांनी गोळीबार केला त्यात जवान संदीप गायकर शहीद झाला त्याचे दोन सहकारी ही गंभीर जखमी झाले
शहीद जवान संदीप गायकर यांचेवर उद्या ब्राम्हणवाडा ता अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
संदीप गायकर हे अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते. प्राणांची आहुती देऊन देशसेवा केली. त्यांच्या बलिदानाने संपूर्ण ब्राम्हणवाडा गाव, अकोले तालुक्यात हळ हळ व्यक्त होत आहे
————