इतर

अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी महासंघाची केंद्रीय पदाधिकारी बैठक पुण्यात संम्पन्न


पुणे दि 8 दिनांक 7 व 8 जून 2025 रोजी भारतीय मजदूर संघ संलग्न भारतीय अंगणवाडी कर्मचारी महासंघ यांच्या वतीने केंद्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यातील विश्वकर्मा भवन, भारतीय मजदूर संघ कार्यालयात यशस्वीरित्या पार पडली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील तसेच इतर राज्यांतील अंगणवाडी सेविका-मदतनीस प्रतिनिधींनी या बैठकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

श्रीमती अंजली पटेल केंद्रीय उपाध्यक्ष, भारतीय मजदूर संघ (ओरिसा ) श्रीमती शर्मिष्ठा जोशी अध्यक्ष, (गुजरात) अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी महासंघ , सरचिटणीस श्रीमती पुष्पा सिंह (झारखंड) श्रीमती वनिता सावंत – उपाध्यक्ष अंगणवाडी महासंघ (महाराष्ट्र) व विविध राज्यांतील अंगणवाडी प्रतिनिधी आणि पदाधिकारी विशेष मार्गदर्शक श्री रविंद्र हिंमते महामंत्री, भारतीय मजदूर संघ श्री अनिल डुमणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, भारतीय मजदूर संघ , श्री किरण मिलगीर सरचिटणीस, भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश , आदी उपस्थित होते

“सरकारी सेवक दर्जा मिळावा”,मानधन नको, किमान वेतन आणि सर्व कर्मचारी हक्क मिळाले पाहिजेत.

“ग्रॅज्युइटी हक्क” – सेवा कालावधी पूर्ण केल्यानंतर ग्रॅज्युइटीचा लाभ प्रत्येक अंगणवाडी सेविका/मदतनीस यांना मिळाला पाहिजे.

“अंगणवाडी महिलांवरील अत्याचार, मानहानी व मानसिक छळ” याबाबत शासनाने तात्काळ कठोर पावले उचलावीत आणि प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण समित्या तयार कराव्यात. अपुरे मानधन आणि त्यामध्ये सातत्याने होणारी दिरंगाई सेवेत स्थायित्वाचा अभाव व वेळेवर मानधन न मिळणे पायाभूत सुविधांचा अभाव स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, योग्य जागा वाढीव जबाबदाऱ्या असूनही सुविधा व आर्थिक लाभ न मिळणे निवृत्तीनंतर कोणतेही आर्थिक सुरक्षिततेचे उपाय नसणे या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली

सरकारी सेवक दर्जासाठी धोरणात्मक लढा उभारण्याचे ठराव
मानधन ऐवजी नियमित वेतन व सर्व सेवाविशेष लाभ लागू करण्याची मागणी आरोग्य व अपघात विमा, EPF व निवृत्ती लाभ योजना लागू करण्याबाबत ठोस पाठपुरावा
अत्याचाराच्या घटनांवर तात्काळ कारवाई व महिला कामगारांच्या सुरक्षेसाठी राज्यस्तरीय यंत्रणा निर्माण करण्याची मागणी,संघटन बळकट करण्यासाठी जिल्हानिहाय जनजागृती मोहीम व मंत्रालयावर भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात येईल. महाराष्ट्रातील न्याय हक्कांसाठीच भारतीय मजदूर संघा च्या झेंडा खाली एकत्रित येऊन संघर्ष करण्याचे आवाहन महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) श्रीमती वनिता वाडकर,सरचिटणीस, वनिता सावंत, नंदा चव्हाण, स्मिता पानसे, यांनी केले आहे.

——

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button