सोलापुरात पद्मशाली समाजातील दहावी- बारावी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न

सोलापूर – सोलापूर शहरातील पद्मशाली समाजातील दहावी आणि बारावीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा माधव नगर येथील बुर्ला मंगल कार्यालय येथे शनिवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते व मार्गदर्शनाखाली थाटात संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ रामदास सब्बन होते. यावेळी यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी उपाध्यक्ष, एसबीसी’चे राज्य निमंत्रक अशोक इंदापूरे, उद्योजक तथा हरिओम विणकर बाग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जून आरकाल, बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक रामकृष्णन नटराजन्, ज्येष्ठ व्यवस्थापक घनश्याम घुलेचा, व्यवस्थापक विष्णू गव्हाणे, यशवंत इंदापूरे, यांच्यासह आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी प्रारंभी पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन मुख्य सोहळ्यास सुरवात करण्यात आले. जवळपास सव्वाशे विद्यार्थी व पालक मोठ्या संस्थेने उपस्थित होते. याप्रसंगी सव्वाशे विद्यार्थ्यांचा गुलाबफूल व पाच लॉंग बुक मान्यवरांच्या हस्ते देउन कौतुक करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम केला आहे. प्रा. विमल नामपल्ली यांनी सूत्रसंचालन केले. फौंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल व पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी प्रास्ताविक करुन मान्यवरांचे स्वागत केले. प्रा. सपना मिठ्ठापल्ली यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे उपाध्यक्ष सतीश चिटमील, सल्लागार सुकुमार सिध्दम, दयानंद कोंडाबत्तीनी, समन्वयक किशोर व्यंकटगिरी, श्रीनिवास रच्चा, सखी संघमच्या पूजा चिप्पा, कल्याणी पेनगोंडा, हेमा मैलारी, ममता मुदगुंडी, कल्पना अर्शनपल्ली, वनिता सुरम आदींचे सहकार्य मिळाले.
