अंध विद्यार्थी वसतिगृहासाठी 50 हजार लिटर क्षमतेच्या पाणी टाकीचे भूमिपूजन संपन्न

नाशिक दि 09
रिंग प्लस एक्वा लि. कडून प्राप्त सिएसआर निधीच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ नाशिक द्वारे अंध विद्यार्थी वसतिगृहासाठी 50 हजार लिटर पाण्याची टाकी बांधून देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ रिंग प्लस एक्वा लि. चे कार्यकारी अधिकारी श्री कमलाकर टाक यांच्या हस्ते व रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष ओमप्रकाश रावत व नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड च्या नाशिक जिल्ह्या शाखेच्या अध्यक्षा अॅड विद्युल्लता तातेड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी विद्युलता तातेड यांनी नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड संचलित अंध विद्यार्थी वसतिगृह व वृद्धाश्रमाच्या प्रकल्पाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. विविध संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या देणगीतून साकार होत असलेला हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाणार असून दिवाळीपूर्वी हा प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष श्रीयुत प्रकाश चंद्रजी सुराणा यांनी दिली.रोटरी क्लब ऑफ नासिक चे अध्यक्ष ओमप्रकाश रावत यांनी रोटरी करीत असलेल्या सामाजिक कार्याविषयी माहिती दिली
अशा समाजोयोगी प्रकल्पांच्या उभारणीसाठी रोटरी क्लब कायमच पाठीशी उभा राहील अशी ग्वाही दिली. रिंग प्लस एक्वा चे कमलाकर टाक यांनी रोटरीच्या माध्यमातून गेली पाच वर्षे सिएसआर देणगीतून विविध सामाजिक प्रकल्प उभे राहिले आहेत आणि रोटरीची विश्वासार्हता खूप मोठी असल्यामुळे कंपन्यांची उदार देणगी अशा प्रकल्पांसाठी प्राप्त होत असते अशी माहिती त्यांनी दिली. नॅबचे सचिव शितल सुराणा यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ नाशिक मानद सचिव शिल्पा पारख, प्रकल्प सचिव हेमराज राजपूत, उपाध्यक्ष विजय दिनानी, निर्वाचित अध्यक्ष गौरव सामनेरकर, विनायक देवधर ,संजय अग्रवाल ,अमित पगारे, वैशाली रावत,निर्मलाबेन शहा, मोहनलाल लोढा, संगीताबेन शहा, एड कांतीलाल तातेड ,राजेंद्र डूंगरवाल, डॉ. सायखेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.