आढळा विभागात खरीप हंगाम पूर्वतयारी अंतर्गत जनजागृती.

एकदरे प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील जायनावाडी, एकदरे, खिरविरे येथे खरीप हंगाम पूर्वतयारी अंतर्गत विविध मोहिमा व’राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान’अंतर्गत जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली.जायनावाडी येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यशाळा उत्साहात पार पडली.या कार्यशाळेला ग्रामस्थांसह बचत गटातील महिला शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात काळू भांगरे यांच्या प्रास्ताविकाने झाली.त्यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी नाथु शेंडे यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची सविस्तर ओळख करून दिली.
त्यांनी या अभियानाचे फायदे आणि महत्त्व समजावून सांगितले,तसेच नैसर्गिक शेती ही काळाची गरज असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी यात सहभागी व्हावे,असे आवाहन केले.सहाय्यक कृषी अधिकारी अरुण बांबेरे यांनी शेतकऱ्यांना मातीचा नमुना कसा काढावा, याबद्दल मार्गदर्शन केले.त्यांनी भात बियाणे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले आणि भात पिकाच्या रोपवाटिकेसाठी गादी वाफा कसा तयार करावा याविषयी माहिती दिली.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी रवींद्र मांडवे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि अॅग्रीस्टॅक योजना यांचा समावेश होता.सहाय्यक कृषी अधिकारी राघू पेढेकर यांनी महाडीबीटी पोर्टलवरील विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी उपस्थित ग्रामविकास अधिकारी विशाल धांडे,सरपंच बाळू डगळे,गोरख भांगरे,रोहिदास भांगरे,मधुकर भांगरे,गोरख भांगरे,पांडुरंग भांगरे,सागर डगळे,कावेरी भांगरे, जनाबाई भांगरे,कृषी सखी आशा भांगरे,प्रज्ञा भांगरे यावेळी उपस्थित होते.
————