आजचे पंचांग व राशी भविष्य दि. 13/06/2025

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ २३ शके १९४७
दिनांक :- १३/०६/२०२५,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०५,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर ग्रीष्मऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- द्वितीया समाप्ति १५:१९,
नक्षत्र :- पूर्वाषाढा समाप्ति २३:२१,
योग :- शुक्ल समाप्ति १३:४८,
करण :- वणिज समाप्ति २७:३६,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- वृषभ – मृग,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मेष,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:५० ते १२:२९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:३३ ते ०९:१३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:१२ ते १०:५० पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:२९ ते ०२:०८ पर्यंत,
❀ दिन विशेष:
गुरु पश्चिम लोप, भद्रा २७:३६ नं.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ २३ शके १९४७
दिनांक = १३/०६/२०२५
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
मनातील इच्छा अधिक प्रबळ होईल. काही गोष्टी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. मुलांच्या तब्येतीची काळजी वाटेल. काही कामे अधिक परिश्रमाने पार पडतील. दिवसभर खटपट करत राहाल.
वृषभ
कामे जलद गतीने करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी संघर्ष वाढू शकतो. काही बदल अपरिहार्यपणे स्वीकारावेत. स्वत:चेच म्हणणे खरे कराल.
मिथुन
कामानिमित्त दिवसभर बाहेर राहावे लागू शकते. यांत्रिक उद्योगातून फायदा संभवतो. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. उपासनेसाठी वेगळा वेळ काढावा. तुमचे तांत्रिक ज्ञान उपयोगात येईल.
कर्क
उष्णतेच्या विकाराचा त्रास संभवतो. काही गोष्टी तडकाफडकी घडू शकतील. खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल. किरकोळ दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. भावंडांचे वागणे विरोधी वाटू शकते.
सिंह
जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. उगाचच मतभिन्नता दर्शवू नका. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात. तुमच्यातील कार्य प्रवीणता दिसून येईल. रागावर नियंत्रण ठेवावे.
कन्या
काम आणि वेळ यांचा ताळमेळ घालावा. भांडकुदळ व्यक्तींचा त्रास संभवतो. तिखट व तामसी पदार्थ खाल. पोटदुखीचा त्रास संभवतो. हातातील कामात यश येईल.
तूळ
मुलांची स्वतंत्र मते समजून घ्यावीत. व्यायामाची आवड पूर्ण करावी. चपळाईने कामे तडीस न्याल. मुलांशी काही गोष्टींवरून मतभेद संभवतात. अविचाराने खर्च करू नका.
वृश्चिक
घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मानसिक शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. दिवसभर कार्यरत राहाल. जमिनीच्या कामातून चांगला लाभ होईल.
धनू
समोरील परिस्थितीतून योग्य मार्ग काढता येईल. मनातील चुकीच्या विचारणा खतपाणी घालू नका. भावंडांचा विरोध सहन करावा लागेल. बौद्धिक चलाखी दाखवाल. टीकेला सामोरी जावे लागू शकते.
मकर
बोलण्याच्या भरात जबाबदारी घेऊ नका. फटकळपणे एखादा शब्द वापरला जाऊ शकतो. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. पुढचा मागचा विचार न करता वागू नका. तिखट व तामसी पदार्थ खाल.
कुंभ
इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. हित शत्रूंचा त्रास संभवतो. अती अट्टाहास करू नका. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. इच्छा शक्तीने गोष्ट तडीस न्याल.
मीन
जनसमुदायाच्या विरोधात अडकू नका. उधार उसनवारीचे व्यवहार टाळा. स्वत:च मानसिक चिंतेला कारणीभूत होऊ शकता. सहकुटुंब प्रवास टाळावा. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर