सोलापुरात जागतिक फादर्स डे, मदर्स डे चे आयोजन

.
‘
सोलापूर : येथील सामाजिक कार्यक्रमाबाबत अनोखा उपक्रमांसाठी ओळखल्या जाणा-या श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संघमच्या वतीने रविवारी जागतिक पालक (फादर्स डे) दिन असून मागच्या महिन्यात झालेल्या जागतिक मातृ (मदर्स डे) दिनाचे औचित्य साधून रविवार, दि. १५ जून रोजी आयोजित केल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा आणि पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी दिले आहे.
पूर्व भागातील, दाजीपेठ येथील श्रीराम मंदिरात सकाळी १०.३० वाजता आयोजन केले असून बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक एक्कलदेवी, उद्योजक विजयकुमार उडता, अखिल भारत पद्मशाली संघमचे (हैदराबाद) सचिव सत्यनारायण गुर्रम, जनता सह. बँकेचे संचालक पुरुषोत्तम उडता यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
वडील अल्पशिक्षित, रात्रंदिवस विड्या करणा-या पत्नीचे साथ, आपली मुले आपल्यासारखं आयुष्य न जगता शिक्षण घेऊन भविष्यात मोठ्या हुद्यांवर गेले पाहिजे, असे स्वप्न पाहणा-या आणि प्रतिकूल परिस्थितीत मुलांना शिक्षण, संस्कार देणा-या अशा काही निवडक पालकांचे रविवारी होणा-या सन्मान सोहळ्यात पद्मशाली समाजासह इतर समाजातील बंधू – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन फाउंडेशन व सखी संघमच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे.