तिखोल येथे मूग पिकाच्या बियाण्यांचे वाटप

कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे : अरुणराव ठाणगे
दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणारी ही योजना कडधान्य उत्पादन वाढवण्यासोबतच शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करेल. तिखोलसारख्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अशा योजनांचा थेट लाभ मिळणे ही स्वागतार्ह बाब आहे. मूग पिकाच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळेल आणि अन्न सुरक्षेला हातभार लागेल. असे मत पारनेर बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण कडधान्य अभियान 2025-26 अंतर्गत पारनेर तालुक्यातील तिखोल गावात मूग पिकाच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. पारनेर बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कृषी विभागाच्या सहाय्यक कृषी अधिकारी अजित क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांना मूग लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. यावेळी
खरीप बियाणे उगवण क्षमता चाचणी, हुमणी किड नियंत्रण, प्रकाश सापळे प्रात्यक्षिक, कृषी पॅनलचे फॉलोवर्स वाढवणे, जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खत व्यवस्थापन, एम आर एन जी फळबाग लागवड याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी अजित क्षीरसागर, सहाय्यक कृषी अधिकारी कल्पना जगदाळे, सहाय्यक कृषी अधिकारी माधुरी बोरुडे यांच्यासह तिखोल गावातील शेतकरी उपस्थित होते. यामध्ये बाळासाहेब ठाणगे, सुभाष ठाणगे, संकेत ठाणगे, भारत ठाणगे, गणेश ठाणगे, राघू ठाणगे, अमोल साळवे, अतुल ठाणगे, संतोष मंचरे, गोरख ठाणगे, सूर्यभान ठाणगे, भाऊसाहेब आग्रे, विठ्ठल ठाणगे, बाजीराव ठाणगे, सुभाष कावरे, हरिभाऊ ठाणगे यांच्यासह अनेक शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले.कृषी विभागाच्या या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणे आणि कडधान्य उत्पादन वाढवून अन्न सुरक्षा व पोषण सुधारणे हा आहे. मूग पिकाच्या लागवडीसाठी तिखोल येथील शेतकऱ्यांनी उत्साह दाखवला. अरुणराव ठाणगे यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सहाय्यक कृषी अधिकार्यांनी शेतकऱ्यांना बियाणे पेरणी, खत व्यवस्थापन आणि पिकाच्या काळजी बाबत तांत्रिक माहिती दिली.