न्यू इंग्लिश स्कूल जांभळेवाडी (सातेवाडी )विद्यालयात विद्यार्थांना सायकल वाटप

अकोले प्रतिनिधी
स्वर्गीय बाबुराव सखाराम बोऱ्हाडे (बी एस बी )एज्युकेशनल संस्था उल्हासनगर संचलित न्यू इंग्लिश स्कूल जांभळेवाडी विद्यालयात संस्थेच्या वतीने पंचवीस विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम करण्यात आला.
ग्रामीण, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दूरहुन प्रवास करने सोपे जावे म्हणून हा उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात आला.लवकरच उर्वरित विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम होणार आहे.
या प्रसंगी सरपंच केशव बुळे यांनी स्वर्गीय बाबुराव बोऱ्हाडे यांच्या विषयी बोलताना म्हणाले की, ” शिक्षणाची गंगा गोर गरीब घरात पोहचली पाहिजे, “ या दृष्टीने संस्थेचे काम सुरु आहे
या प्रसंगी काशिनाथ दिघे, भास्कर दिघे, मुख्याध्यापक पंडित देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या वेळी उपसरपंच श्रीमती गभाले, बी के देशमुख, लक्ष्मण मुठे, भरत दाभाडे, लक्ष्मण दिघे, कृष्णा दिघे, वसंत मुठे, सोमनाथ दिघे उपस्थित होते.
सातेवाडी , घोटकरवाडी, येसरठाव, खेतेवाडी, मोरवाडी, गांजविहीर, जांभळेवाडी येथील ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्थाविक मुख्याध्यापक शरद देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन हरिश्चंद्र काळे यांनी केले आभार खुरपे मॅडम यांनी व्यक्त केले.