सुप्यात कारमधुन शस्रांसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची चाहूल लागताच तिघे फरार

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील सुपा येथे तिघांनी कारमधून शस्त्रे आणल्याची माहीती सुपा पोलिसांना मिळाली, व पोलिसांची चाहूल लागताच गुन्हेगार शस्रे व कार सोडून पसार झाले.
याबाबत पो काँ विकास रमेश गायकवाड यांनी
सुपा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवार दिनांक १४ जून रोजी पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांचे आदेशान्वये सुपा पो स्टेशन हद्दीमध्ये फरार आरोपी व अवैद्य धंद्यावर कार्यवाही करणेबाबत सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, स.फो. एस. एम. खैरे, पोहेकाँ धामणे, पोकों प्रशांत दिवटे, पोकाँ ढाकणे असे सरकारी वाहन क्र. एम.एच. १६ डी.जी. ५९८६ मधून पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सायंकाळी ६ वा चे सुमारास सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, पारनेर ते सुपा रोडवरुन एक पांढ-या रंगाची कार क्र. एम.एच. १२ क्यू. टि. ७४४० मधुन अमोल कर्डीले, अर्जुन बडे, सुनिल बडे (पूर्ण नाव गाव पत्ता माहित नाही) हे अवैद्य शस्त्रांची वाहतुक करीत आहेत,
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लगेच स. फो. एस.एम, खैरे यांनी दोन पंच महेश हिरामण शिंदे वय ३२ वर्षे रा. हंगा ता. पारनेर, सागर अशोक नगरे वय-३२ रा. हंगा ता. पारनेर यांना हंगा गावचे शिवारातील मंगलम चौकात बोलावून बातमीतील मजकुर सांगुन पंच म्हणून सोबत घेऊन सुपा ते पारनेर रोडने सदर वाहनाचा शोध घेत असताना वरील नबंरची कार हंगा गावचे शिवारातील साई रेसिडेन्सी येथे उभी असलेली दिसली पंच व पोलीसांची खात्री होताच सरकारी वाहनातुन खाली उतरुन सदर कारचे दिशेने पायी चालत निघाले असता सदर कारमधून तीन इसम खाली उतरले व त्यांना पंच व पोलीसांची चाहुल लागताच ते त्यांची कार सोडून अंधाराचा फायदा घेवुन पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला परंतु ते अंधाराचा फायदा घेवून पळून गेले सदर वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये खालील वर्णाचे व किंमतीचे घातक शस्त्रे मिळून आली
५ लाख रुपये किंमतीची एक मारुती कंपनीची सियाज कार क्र. एम.एच. १२ क्यू, टी. ७४४० असलेली जु.वा.कि.अ, १ लाख रुपये किंमतीचा एक सॅमसंग कंपनीचा फोल्डींगचा मोबाईल जु.वा.कि.अ. १०० रुपये किंमतीची एक लोखंडी कटावनी एका बाजुस वक्राकार असलेली व दुस-या बाजूस जाड रेघारेघाची मुठी, १०० रुपये किंमतीचा एक निळ्या रंगाची प्लॉस्टीकची मुठ असलेला लोखंडी कोयता त्याची निळ्या रंगाची प्लास्टीकची मुठ ६ इंच व पाते १२ इंच असलेला, १०० रुपये किंमतीचा एक पोपटी रंगाची प्लॉस्टीकची मुठ असलेला लोखंडी कोयता त्यांची पोपटी रंगाची प्लास्टीकची मुठ ६ इंच व पाते १२ इंच असलेला, २०० रुपये किंमतीचे दोन प्लॉस्टीकडे बेस बॉल चे दांडके काळे रंगाचे, ५०० रुपये किंमतीचे एक स्टिलचे दांडके २६.५ इंच लांबीचे व त्यास ६.५ इंचाचे लोखंडी काळे रंगाचे पाते असलेली कु-हाड, असा एकूण ६,०१,००० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रमाणे वरील वर्णनाचा व किमतीचे वाहन, मोबाईल व घातक शस्त्रे मिळून आल्याने दोन पंचासमक्ष स.फो. एस.एम. खैरे यांनी सविस्तर पंचनामा केला अशी फिर्याद दिली.
सुपा पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली स फौ. एस. एम. खैरे हे करत आहेत.