आजचे पंचांग व राशी भविष्य दि. २१/०६/२०२५,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ ३१ शके १९४७
दिनांक :- २१/०६/२०२५,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०७,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति ०७:१०, एकादशी २८:२८,
नक्षत्र :- अश्विनी समाप्ति १९:५०,
योग :- अतिगंड समाप्ति २०:२९,
करण :- बव समाप्ति १७:५६,
चंद्र राशि :- मेष,
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – मृग,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मेष,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयतिथि वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:१३ ते १०:५२ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:३४ ते ०९:१३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:१० ते ०३:४९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:४९ ते ०५:२८ पर्यंत,
❀ दिन विशेष:
योगिनी (स्मार्त) एकादशी, दक्षिणायनारंभ, जागतिक योग दिन, कर्कायन ०८:१२, पुण्यकाल ०८:१२, सौर वर्षाऋतु प्रारंभ, भद्रा ०७:१९ प., घबाड १९:५० नं. २८:२८ प.,
————–
: 🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ ३१ शके १९४७
दिनांक = २१/०६/२०२५
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
आवडीचे पदार्थ खायला मिळतील. तुमच्या कामात हळूहळू सुधारणा करता येईल. संपर्कातील लोकांचे सहकार्य मिळेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. जोडीदाराची निवड ग्राह्य मानावी लागेल.
वृषभ
तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. कौटुंबिक कामाचा ताण वाढेल. कामे आपल्या मर्जीनुसार करण्यावर भर द्याल. समोरील प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. मनाची द्विधावस्था टाळावी.
मिथुन
मित्रत्वाची भावना जोपासाल. मानसिक ताण हलका करण्याचा प्रयत्न करावा लागेल. निराशाजनक विचार मनातून काढून टाकावेत. धार्मिक कामात मन गुंतवावे. व्यावसायिक बदलांकडे लक्ष ठेवावे.
कर्क
कामातील सक्रियता वाढवावी लागेल. गरज भासल्यास अधिकार्यांचा सल्ला विचारात घ्यावा. मानसिक चंचलता जाणवेल. मनातील संकोच दूर सारावा. जोडीदाराविषयी मनात शंका आणू नका.
सिंह
स्वमुल्यावर कामे करत राहाल. व्यावसायिक लाभाबाबत सतर्क राहावे. आत्मविश्वासाने परिपूर्ण वृत्ती अंगीकारू शकाल. आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष नको. पाठदुखी सारखे त्रास जाणवू शकतात
कन्या
इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. जोडीदाराची समजूत काढावी लागेल. मदतीचा हात सदैव पुढे कराल. तुमचा दृष्टीकोन बदलून पहा. भागीदारीत अधिक लक्ष घाला.
तूळ
योग्य पथ्ये पाळावीत. पोटदुखी सारखे त्रास जाणवू शकतात. काही कामे जलद गतीने मार्गी लागतील. सासुरवाडीची मदत घेता येईल. अधिकार्यांच्या विरोधात कामे करू नका.
वृश्चिक
कोणत्याही वाटाघाटी करताना सावध राहावे. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. भागीदारीत विशेष लक्ष घालावे. वारसाहक्काच्या कामातून लाभ होईल.
धनू
आर्थिक चढ-उतार लक्षात घ्यावेत. नवीन धाडस करताना सारासार विचार करावा. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे. चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. अनाठायी खर्च वाढू शकतो.
मकर
कामाच्या ठिकाणी आळस करू नका. इतरांच्या सल्ल्याने वागताना विचार करावा. एकमेकांचे सुख-दू:ख नीट जाणून घ्या. नातेवाईकांची मनधरणी करावी लागू शकते. भिन्नलिंगी व्यक्तिला आकर्षित करू शकाल.
कुंभ
बोलताना भान राखावे लागेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरातील गोष्टींबाबत फार दक्ष राहाल. मनातील आतुरता वाढीस लागेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
मीन
स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. कामे अधिक जोमाने कराल. काही स्वतंत्र मते मांडाल. संपूर्ण विचारांती कृती करावी. भावंडांचे सहकार्य मिळेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर