दिलीप जगताप यांनी पिंपळगाव रोठा येथे विद्यार्थ्यांना वाटले शैक्षणिक साहित्य

जगताप यांचा शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद : अशोक घुले
दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
युवा सहकारी दिलीप जगताप यांनी राबवलेला हा उपक्रम गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. लहान मुलांना अक्षरओळख व्हावी आणि त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. अशा सामाजिक कार्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. असे मत राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते व पिंपळगाव रोठा गावचे माजी सरपंच अशोक घुले यांनी व्यक्त केले.
पिंपळगाव रोठा गावचे युवा नेते व ग्रामपंचायत सदस्य दिलीप जगताप यांनी जागतिक योग दिनानिमित्त जगतापवस्ती येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवला. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना वह्या, कंपास पेटी, तसेच आवश्यक शालेय साहित्य देण्यात आले. विशेष म्हणजे, बालवाडीच्या लहान मुलांना अक्षरओळख व्हावी यासाठी अंकल्पिचे वाटप करण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या खाऊचेही वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाला गावचे माजी सरपंच अशोक घुले पाटील, जी.एस. महानगर बँकेचे संचालक सुरेश ढोमे, विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पोपट सुपेकर यांच्यासह शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, वयोवृद्ध ग्रामस्थ आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या उपक्रमाने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा ठरला यामुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या कार्यक्रमाने जागतिक योग दिनाचा उत्साह द्विगुणित झाला.
शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे पिंपळगाव रोठा येथील सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी असेच उपक्रम भविष्यात राबवले जातील.
यापुढील काळातही सामाजिक बांधिलकी जपत काम करणार आहे.दिलीप जगताप
(ग्रामपंचायत सदस्य पिंपळगाव रोठा)