अकोले येथे सोमवारी महारोजगार मेळाव्याचे आयोजन

अकोले /प्रतिनिधी
माजी मंत्री स्व. मधुकर पिचड यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी व रोटरी क्लब अकोले सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. २ जून रोजी सकाळी १० वाजता पॉलिटेक्निक कॉलेज अकोले येथे ‘महारोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर व रोटरी क्लबचे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते यांनी दिली.
या मेळाव्यामध्ये पुणे व नाशिक जिल्ह्यातील एकूण १७
नामांकित कंपन्या सहभागी होणार असून जवळपास १८०० युवकांना रोजगाराची संधी देण्यात येणार आहे. कंपन्यांचे एचआर मॅनेजर मुलाखतीसाठी उपस्थित राहणार आहेत. डिग्री, डिप्लोमा, आय. टी. आय., एम. बी. ए., बी.
फार्मसी, बी.ए., बी कॉम., बी. एस्सी., दहावी, बारावी उत्तीर्ण
विद्यार्थ्यांना रोजगार मिळणार आहे.
तरी सर्व आहे. तरी सर्व इच्छुक विद्या-र्थी उमेदवारांनी मुलाखतीसाठी कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव।सुधाकर देशमुख, खजिनदार।धनंजय संत, सर्व कार्यकारिणी सदस्य, रोटरी क्लब अकोले सेन्ट्रलचे सचिव अमोल देशमुख, उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी, सहसचिव समीर सय्यद, खजिनदार संदीप मोरे, पब्लिक इमेज डायरेक्टर दीपक महाराज देशमुख, पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे. यासाठी नाशिक येथील युवा शक्ती फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
दरम्यान, मेळाव्याचे उद्घाटन सकाळी १० वाजता संस्थेचे कार्यकारी विश्वस्त तथा माजी आमदार वैभव पिचड यांच्याहस्ते व दीपक महाराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी सर्व संस्थांचे प्राचार्य, युवाशक्ती फाउंडेशनचे वैभव कुलकर्णी, नवनाथ भराडे, सागर पवार व अमोल धोंगडे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अकोले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. डी. पल्हाडे, एमबीएचे डायरेक्टर डॉ. प्रशांत तांबे, आयटीआयचे प्राचार्य अरुण भालेराव, मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्या डॉ. पल्लवी फलके यांनी दिली.
———