ज्ञानविकास रात्रशाळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

मुंबई, सायन आज दिनांक २६/२/२०२५सायन (पुर्व) मधील सायन काला किल्ला जवळील जोगळेकरवाडी म्युनिसिपल शाळा संकुलमधील सुप्रसिध्द ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पुर्व), येथे मुख्याध्यापक परदेशी सर यांच्या अधिपत्याखाली लोककल्याणकारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

ह्या सोहळ्याच्या प्रारंभी वर्गशिक्षक सुर्यवंशी सर यांनी सुत्रसंचलन करून सोहळ्याचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक परदेशी सर यांच्या हस्ते
छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले तर प्रमुख अतिथी लाभलेल्या सायन (पुर्व) मधील एबल एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा आणि समाजसेविका अनुराधा
गणेश बिंगी मॅडम ह्यांनी दीप प्रज्वलन केले व मासूम संस्थाचे प्रोजेक्ट मॅनेजर धनश्री मॅडम यांनी सुगंधी उद् बत्ती प्रज्वलित करून उत्साह निर्माण केला.
उपस्थित मान्यवरांनी ह्या सोहळ्याचे महत्व सांगताना रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपल्या भाषणात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक कार्य आणि त्यांच्या शिक्षणासंबंधी जागृत कार्याची आजच्या काळात असलेली प्रासंगिकता यावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या आदर्श विचारांवर चालण्याचे आवाहन केले.

सोहळ्या दरम्यान अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक परदेशी सरांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची आणि त्यांच्या दूरदृष्टीची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शाहू महाराजांनी समाजातील दुर्बळ घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच आज आपण विकासाचे टप्पे गाठू शकलो आहोत. शिक्षणाचे महत्त्व, जातीय भेदभावाचे निर्मूलन आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या कार्यावर त्यांनी विशेष भर दिला आणि भाषणाच्या शेवटी परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले.
छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या महान कार्याची आणि त्यागाची जाणीव झालली दिसत होती तर आपापल्या परिसरातील परिचयातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा संकल्प केला.
सोहळ्याचा समारोप करण्याआधी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून एबल एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. अनुराधा मॅडम यांनी स्वखर्चाने रात्रशाळेतील सर्व महिला विद्यार्थींना रेडीमेड आकर्षक सलवार कुर्ता (पंजाबी ड्रेस) वाटप करून ऋणानुबंध राखले आणि शेवटी भाषातज्ञ शिक्षक अजित सरांनी उपस्थित मान्यवर, विशेषत: अनुराधा मॅडम यांचे आभार मानत हा सोहळा संपन्न करण्यासाठी दिलेल्या सहभागाबद्दल सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचे आभार मानले व राष्ट्रगीताने समारोप केला.