पारनेर. सुपा रस्त्यावरील वडाच्या झाडांची कत्तल.

दत्ता ठुबे
पारनेर दि.२७ पारनेर प्रतिनिधी
गेल्या दोन तीन दिवसापासून पारनेर सुपा या राज्यमार्गावरील १०० ते १५० वर्ष पुरातन विशाल वडाच्या झाडांची कत्तल करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
त्या मुळे येत्या काही दिवसातच या रस्त्यावर असणारे वड, पिंपळ, आंबा या वृक्षांची कत्तल करण्यात येऊन रस्त्यावर एकही झाड दिसणार नाहीत तसेच महिलाना वट पौर्णिमेला पूजा करण्यासाठी वड दिसणार नाहीत अशी परिस्थिती आहे.
पारनेर सुपा मार्गावरील सुरू असलेली सुमार वृक्षतोड हि पोटाला पीळ आणणारी आहे. मागील अनेक वर्षापासून या रस्त्याची सौंदर्य वाढवणारी आणि निसर्गाचे संगोपन करणारी हि झाडे रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावाखाली कापली जात आहे. मोठ मोठी वृक्ष आडवी करून त्याचा नायनाट केला जात आहे. मात्र याला कोणीही विरोध करताना दिसत नाही. निसर्गाचा ऱ्हास होत आहे. ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. पर्यावरण धोक्यात सापडले आहे.

अशाही परिस्थितीत मोठ्या वृक्षाची कत्तल होणे हि पुढील पिढीसाठी धोकादायक बाब आहे. मात्र या कडे शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या बाबींकडे लक्ष वेधून आता माणसा जागा हो आणि तूच एक तरी झाड लाव हे झाड आपल्याला ऑक्सिजन देणार आहे. आपले जिवन वाचवणार आहे. हे झाड आपल्याला काहीच मागत नाही तर ते आपल्याला सदैव काही ना काही देतच राहते. सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक वृक्षमित्र संस्था, यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.