भगूर चे डॉ. शाम जाधव जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

नाशिक प्रतिनिधी.
नाशिक. आज दिनांक २९/६/२०२५ रोजी मनु मानसी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने २९ जून रोजी जोशी नर्सरी शेजारी व के के वाघ कॉलेज समोर मुंबई आग्रा हायवे नाशिक ३ द पवार गार्डन मध्ये जीवन गौरव पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन आले होते त्यामध्ये भगूर चे डॉ. शाम जाधव यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल नाशिक ह्या दोन्ही संस्था सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आलेले आहेत. मनु मानसी संस्था सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, महिलांचे सबळीकरण यावर कार्य करते. अनाथ आश्रम, वृद्ध आश्रम साठी सतत दोन्ही संस्था कार्य करत असतात.

मनु मानसी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल नाशिक यांच्या वतीने समाजासाठी आदर्श असलेले ५० वर्षे पुढील ज्येष्ठ नागरिक यांचे साठी जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रमुख अतिथी डॉक्टर शेफाली ताई भुजबळ, श्री सुनील पवार सर ( पोलीस निरीक्षक क्रम ब्रांच नाशिक ), महंत भक्ती चरणदास जि महाराज ( अ.भा आखाडा परिषद राष्ट्रीय प्रवक्ता ), राम डावरे सर ( सी ए), डॉ. विठ्ठल सिंग ठाकरे सर, सौ मेघाताई राजेश शिंपी (मनू मानसी संस्थापिका अध्यक्ष ), डॉ. अनिल नहार ( महावीर इंटरनॅशनल नाशिक ) श्रीमती मंजू जखाडी कार्याध्यक्ष नाशिक या मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. मनु मानसी संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच माझ्या सर्व बंधूंच्या आग्रा हस्त जीवन गौरव पुरस्कार महावीर इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने मनु मानसी बहुउद्देशीय संस्था घेतली संस्थापिका सौ. मेघाताई राजेश शिंपी यांनी व्यक्त केले.
समाजमध्ये कार्य करतो तेव्हा अनेक अडचणी येतात पण जेव्हा एक सामाजिक संस्था दुसऱ्या सामाजिक संस्थेला मदतीचा हात देते तेव्हा ते कार्य होऊ शकते. संस्था पण पुढे जाते. खरोखरच आज महावीर इंटरनॅशनल चे अध्यक्ष मा. श्री डॉ. अनिल नहार सरानी मनु मानसी संस्थेला पुढे नेण्यासाठी मदतीचा हात दिला खरोखरच ही अभिमानास्पद गोष्ट आहे. मागे वळून बघता माझ्या अनेक सामाजिक संस्थनी मनु मानसी बहुउद्देशीय संस्थेला सहकार्य केले आहे. कारण मनु मानसी संस्थेच्या कार्याची पद्धत, नियोजन खुप छान असते.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे अशा ७० बंधूंना सन्मानित करणार आहोत. ही माहिती महावीर इंटरनॅशनल चे अध्यक्ष डॉ.अनिल नहार सर, मनु मानसी संस्थेच्या संस्थापिका सौ मेघा ताई राजेश शिंपी, कार्याध्यक्ष मंजू जाखाडी यांनी दिली आहे. तरी सर्वांची उपस्थिती होती