इतर

जिल्हा परिषदेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे ९ जुलै पासून आझाद मैदानावर ‘बेमुदत उपोषण’ आंदोलन

आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा – राज्याध्यक्ष मुकुंद तुरे

अंबाजोगाई (प्रतिनिधी)


पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ९ जुलै पासून आझाद मैदान, मुंबई येथे होणाऱ्या ‘बेमुदत उपोषण’ आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष मुकुंद तुरे यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे जिल्हा परिषदेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी मागील एक वर्षांपासून भाऊसाहेब पठाण (अध्यक्ष, राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, मुंबई.) यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे पाठपुरावा सुरू आहे, ग्रामविकास विभागाने दि.१३ जून २०२४ रोजी निर्गमित केलेले आरोग्य सेवकपदाचे सेवाप्रवेश नियमाचे प्रारूपामध्ये जिल्हा परिषदेमधील पूर्वीपासुन सेवेत असलेल्या माध्यमिक शालांत परिक्षा(१० वी) उत्तीर्ण गट-ड कर्मचा-यांना आरेग्य सेवक पदावर २५ टक्के पदे ही पदोन्नतीसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तथापि, सदर सेवाप्रवेश नियमांचे प्रारूपास गेल्या वर्षापासून अंतिम मान्यता मिळण्याचे प्रलंबित आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांमधील वर्ग-४ कर्मचा-यांच्या आरोग्य सेवक पदावर होणा-या पदोन्नत्या नाहक रखडलेल्या आहेत. त्याकरिता सदर प्रारूपास अंतिम मान्यता तात्काळ मिळावी, अशी महत्वाची मागणी आहे.

ग्रामविकास विभाग अधिसूचना दि.७ मार्च २०२४ अन्वये नवीन सुधारीत सेवाप्रवेश नियम निर्गमित झाले असुन, त्यामघ्ये रिक्त पदांचे भरतीचे प्रमाण ५०:४०:१० (५० टक्के सरळसेवेने, ४० टक्के पदोन्नतीने व १० टक्के वाहनचालकांमधून लिपीक-टंकलेखक) असे आहे. त्यानुसार पदोन्नतीने ४० टक्के भरावयाच्या जागांमध्ये जिल्हा परिषद परिचर वर्ग-४ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक वर्ग-३ पदांवर पदोन्नती देण्याची तरतूद आहे. त्याप्रमाणे राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद परिचरांना कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नत्या झाल्या आहेत. मात्र, फक्त जिल्हा परिषद हिंगोली, चंद्रपुर जिल्हा परिषदांमधील परिचरांच्या कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नत्या दिल्या जात नाहीत. त्यासाठी संघटनेचे राज्याध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी सतत मा.प्रधान सचिव, मा.उपसचिव यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

तसेच या प्रकरणी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी, यांना शासन स्तरांवरूनदेखील पत्रव्यवहार झालेला आहे. तरीदेखील मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणी दखल घेत नाहीत. तरी महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये परिचर वर्ग-४ पदांवरुन आरोग्यसेवक वर्ग-३ पदांवर पदोन्नती करिता २५ टक्के पदे मिळविणे, तसेच परिचर वर्ग-४ पदांवरुन कनिष्ठ सहाय्यक वर्ग-३ पदांवरील ४०:५०:१० या प्रामाणातील पदोन्नती कोटा पुर्ण होईपर्यंत पदोन्नती प्रक्रिया निरंतर राबविणे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व पशुसवंर्धन विभागांतील रिक्त पदे तात्काळ सरळसेवेने भरती प्रक्रिया राबविणे, राज्य शासनांच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या बरोबरीने जिल्हा परिषदेंच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना २५०/- रूपये धुलाई भत्ता होणे, जिल्हा परिषदेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नतीचा पहिला लाभ एस-3 (१६६००-५२४००) ऐवजी एस-6 (१९९००-६३२००) होणेसाठी तसेच कनिष्ठ सहाय्यक लिपीक पदांप्रमाणेच कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदांवर देखील पदोन्नती / सरळसेवा / वाहनचालकांतून नामनिर्देशनाने हे प्रमाण ४०:५०:१० या व इतर मागण्या पदरांत पाडून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांनी भाऊसाहेब पठाण (अध्यक्ष, राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, मुंबई.) यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान, मुंबई येथे दि.९ जुलै २०२५ पासून होत असलेल्या ‘बेमुदत उपोषण’ आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन मुकुंद तुरे (राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना.) यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button