वाकी ते देवगाव डांबरी रस्त्यावर भात लागवडीचा इशारा!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील वाकी ते देवगाव रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या मनमानीमुळे डांबरी रस्त्याची दिवसेंदिवस गंभीर परिस्थिती होत आहे रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास डांबरी रस्त्यावरील चिखलात भात लागवड करण्याचा इशारा अकोले तालुका आरपीआयचे तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी दिला आहे
या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याने आज रस्त्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे वाकी ते देवगाव या रस्त्यावर मान्हेरे, आंबेवंगण, लाडगाव, देवगाव, शेणित आदिवासी बहुल गावांचे दळणवळण मोठ्या प्रमाणात आहे . या रस्त्याचा वापर शालेय विद्यार्थी शेंडी, भंडारदरा, राजूर या ठिकाणी जाण्यासाठी करतात, तर नागरिकांना आठवडे बाजार, आरोग्यविषयक गरजांकरिता देखील या मार्गावरूनच जावे लागते . मात्र या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहे पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचत आहे. परिणामी अपघातांचे

प्रमाण वाढले असून अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. मोठया वाहनांचे खड्ड्यांमुळे नुकसान होत आहे यामुळे परिसरातील नागरिकांत राजूर सार्वजनिक बांधकाम खात्या बाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे
राजूरच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे अनेक वेळा रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आली आंदोलन करण्यात आले त्यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिले होते परंतु अद्याप त्यास मुहूर्त मिळाला नाही यामुळे आज रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे