सेवा सहयोग संस्थेने फुलविले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू!

कोतुळ/ प्रतिनिधी
पुणे येथील सेवा सहयोग सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी भागातील गरजू 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संचचे वाटप करण्यात आले.
दि.28.6.2025 रोजी सदरचे शैक्षणिक साहित्यांचे अकोले तालुक्यातील पैठण, पैठणवाडी, बुळेवाडी व गंभीरेवाडी (पैठण) तसेच गंभीरवाडी (सोमलवाडी) या एकूण ५ शाळांमध्ये करण्यात आले. सदर शैक्षणिक साहित्य किटमध्ये दप्तर, वह्या, कंपास पेटी, पाऊच, चित्रकला वही, सराव पुस्तिका, पेन्सिल, खोड रबर, शार्पनर , पट्टी , कलर खडू व क्रेओन इ. एकूण १३ प्रकारचे साहित्य आहेत.

या साहित्याचा शैक्षणिकदृष्ट्या निश्चितच फायदा होणार आहे. सदर साहित्य हे या भागातील पुणे येथे कार्यरत अधिकारी श्री. अनिल गंभिरे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध करून देण्यात आले , सदर साहित्यांचे वितरण पुणे येथील शिक्षण आयुक्तालयातील अधिक्षक श्री. संजय गंभिरे यांचे हस्ते करण्यात आले.
आम्ही ज्या मातीत जन्मलो, शिक्षण घेतले व संस्काराचा वसा मिळाला त्यातून उतराई होण्याचा हा लहानसा प्रयत्न आहे
संजय गंभीरे
शाळेचे मुख्याध्यक श्री. दीपक बोऱ्हाडे सर, लोहरे सर, वाल्हेकर सर, कदम सर, गोंदके सर व सहशिक्षक बगाड सर, पथवे सर,देशमुख सर, ताजणे मॅडम, तसेच ग्रामस्थ उपस्थीत होते.
