आजचे पंचांग व राशिभविष्य दि ०७/०७/२०२५,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ १५ शके १९४७
दिनांक :- ०७/०७/२०२५,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०९,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति २१:१६,
नक्षत्र :- विशाखा समाप्ति २२:४२,
योग :- साध्य समाप्ति २१:२७,
करण :- वणिज ०८:१०,
चंद्र राशि :- तुला,(१६:०१नं. वृश्चिक),
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – पुनर्वसु,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- वृषभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- विशाखा वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०५:३० ते ०७:०९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:१७ ते १०:५५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५५ ते १२:३४ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:१३ ते ०३:५१ पर्यंत,
❀ दिन विशेष:
शयनी एकादशी, चातुर्मास्यारंभ, पंढरपूर यात्रा, गुरु पूर्व दर्शन, मोहरम, दग्ध २१:१६ नं., घबाड २२:४२ नं., भद्रा ०८:१० नं. २१:१६ प., मृत्यु २२:४२ नं.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ १५ शके १९४७
दिनांक = ०६/०७/२०२५
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. परक्या व्यक्तींपासून दूर राहावे. या आधीचा कामातील अनुभव उपयोगी पडेल. सरकारी कर्मचाऱ्यांनी दुविधा टाळावी. जवळचे मित्र भेटतील.
वृषभ
आवश्यकता असेल तरच बोलावे. आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. स्वत:च्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल. दिवस मजेत जाईल. गोडीगुलाबीने कार्य साधाल.
मिथुन
कामाच्या स्वरुपाचे नवीन मार्ग शोधावेत. क्षणिक मोहात पडाल. स्वत:वर खर्च कराल. आर्थिक उलाढाल चांगल्या प्रकारे होईल. मनात नसती शंका आणू नका.
कर्क
आपल्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. कामात स्त्रियांची चांगली मदत मिळेल. चैन करण्याकडे अधिक कल राहील. व्यवसायातून चांगली कमाई होईल. पुढील गरजांसाठी आत्ताच खर्च कराल.
सिंह
व्यावसायिक कामातून चांगला लाभ मिळवाल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. दिवस आनंदात जाईल. नवीन विचार जोपासले जातील.
कन्या
धार्मिक गोष्टींची आवड पूर्ण कराल. ग्रह बदलाचा चांगला परिणाम दिसून येईल. आपल्या समोरील व्यावसायिक संधी ओळखा. त्यातून तुमची सकारात्मकता वाढेल. पत्नीशी वाद वाढवू नका.
तूळ
अचानक धनलाभाची शक्यता. कमी श्रमातून कामे साध्य करता येतील. जुनी देणी भागवता येतील. योग्य गुंतवणूक करू शकाल.
वृश्चिक
व्यावसायिक अनुकूलता लाभेल. मित्रांच्या ओळखीतून लाभ होईल. प्रेमाचे संबंध अधिक घट्ट होतील. नवीन लोकांशी परिचय वाढवता येईल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल.
धनू
मानसिक शांतता लाभेल. त्यातून नवीन विचारांना चालना देता येईल. तुमच्यातील कल्पकतेला वाव देण्याचा प्रयत्न करावा. हाताखालील लोकांकडून कामे सुरळीत पार पडतील. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील.
मकर
अधिक चपळाईने कामे करता येतील. कलेचा मनमुराद आस्वाद घ्याल. उगाचच येणारा आळस टाळावा लागेल. ऐनवेळी होणारी गडबड टाळावी. कामाचा योग्य आराखडा तयार ठेवावा.
कुंभ
घरात टापटीप ठेवाल. घरातील काही कामे स्वत:हून अंगावर घ्याल. दिवस आपल्या स्वत:च्या इच्छेनुसार घालवाल. नवीन ओळखी करून घ्याव्यात. भडक शब्द वापरणे टाळा.
मीन
निश्चयानुसार वागावे. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. जुने मित्र गोळा कराल. कामासाठी काही वेगळे पर्याय शोधावेत. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर