पारनेर तालुका बौद्ध हितवर्धक सेवा संघाच्या वतीने गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी.

दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुका बौद्ध हितवर्धक सेवा संघ व राहुलनगर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर शहरातील तक्षशिला बुद्धविहार येथे आषाढी गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उपासक रावसाहेब वाघमारे होते.
मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले.या वेळी बाळासाहेब पातारे, प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर,संतोष विधाटे, सुखदेव थोरात यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास उपनगराध्यक्ष राजु भाई शेख, किरण कोकाटे, मंगेश दाते, राजेंद्र ठुबे,संतोष आडसुळ, संजीवन पाडळे, दादाभाऊ पटेकर, संपत नगरे, सतिश सुर्यवंशी, प्रविण शिरसाठ,चंद्रकांत गायकवाड,पुनाराम चौधरी, अंकुश गायकवाड, संभाजी करंदीकर,राजु उघडे, गौतम पाडळे,मच्छिंद्र साळवे, सखाराम पातारे,राजेश करंदीकर,अभिजीत तडके,नवीन साळवे,राजु उघडे, निखिल गायकवाड,प्रदीप नगरे,अक्षय जाधव,उपासिका करुणा जाधव, दीक्षा जाधव, पौर्णिमा जाधव,संजीवन सोनवणे, सुनिल चौधरी,प्रदीप कसबे,आदित्य करंदीकर व सिद्धार्थ वसतीगृह आणि सनसाईज ॲकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपासक राजेंद्र करंदीकर यांनी वर्षावास आरंभ आणि आषाढी पौर्णिमा बाबत माहिती दिली ते म्हणाले की तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये आषाढी पौर्णिमाला फार महत्व आहे. आषाढी पौर्णिमा दिवशी सिद्धार्थ गौतमाने लोककल्याणासाठी गृहत्याग केला होता आणि वर्षावासाची आरंभ पण याच दिवशी होतो. या मध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्ञानप्राप्तीनंतर तथागतांनी आषाढी पौर्णिमेला सारनाथ येथे मृगदाय वनात पंच वर्गीय भिक्खूना पहिल्यांदा धम्माचा उपदेश दिला आणि पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले.
समस्त मानवतेला विश्व बंधुत्व, लोककल्याण, मंगल मैत्री, व करुणा शिकवणाऱ्या धम्माचा प्रचार व प्रसार केला. आणि भिक्खू संघाची स्थापना केली. म्हणूनच संपूर्ण जगात बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या उत्साहात गुरू पौर्णिमा साजरा करतात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवन सोनवणे यांनी केले तर आभार चंद्रकांत गायकवाड यांनी मानले.
: गुरु पौर्णिमा निमित्ताने आर पी आय तालुकाध्यक्ष प्रदीप नगरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिद्धार्थ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना हजारो रुपयांचे शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.