इतर
आदिश्री संतोष म्हस्के हिचा शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये CBSE राज्य गुणवत्ता यादीत 14 वा क्रमांक

अकोले प्रतिनिधी
अकोले येथील अकोले तालुका एज्युकेश सोसायटी चे परफेक्ट इंटरनॅशनल स्कूल या शाळेची इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी आदिश्री संतोष म्हस्के हिने नुकत्याच झालेल्या पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये 298 पैकी 260 (87.24%) गुण मिळवत CBSE राज्य गुणवत्ता यादीमध्ये 14 वा क्रमांक मिळवला
अहिल्यानगर जिल्ह्यात तिचा दुसरा क्रमांक तसेच अकोल्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला असून तिने उज्वल यश संपादन केले आहे. याबाबत सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत असून यासाठी तिला शाळेतील शिक्षक, प्राचार्य सौ. मीनाताई नवले मॅडम त्याचबरोबर पालक इत्यादी सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
अकोले तालुक्यात तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे