इतर

भारतीय मजदूर संघाच्या 23 जुलै वर्धापन दिनासाठी तयारी बैठक यशस्वी

पुणे-दिनांक: १४ जुलै २०२५।

* 23 जुलै वर्धापन दिनासाठी भारतीय मजदूर संघाची पुण्यात तयारी बैठक यशस्वी – विविध क्षेत्रांतून उत्स्फूर्त सहभाग

भारतीय मजदूर संघाच्या 23 जुलै वर्धापन दिनानिमित्त व्यापक जनजागृती, प्रचार आणि आंदोलनात्मक उपक्रमांची आखणी करण्यासाठी पुणे येथे महत्त्वपूर्ण तयारी बैठक यशस्वीपणे पार पडली.

या बैठकीत उद्योग, बँकिंग, संरक्षण, मेट्रो, शिक्षण, वीज, इंडियन ऑईल, बालभारती आणि कंत्राटी कामगार संघटनांतील प्रतिनिधींनी सक्रीय सहभाग नोंदवून एकात्मिक कृतीचे समर्थन केले.

बैठकीचे प्रास्ताविक श्री. सचिन मेंगाळे, सरचिटणीस – अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ यांनी करताना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी कामगार जागृती आणि संघर्ष आंदोलनांची आवश्यकता अधोरेखित केली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. अर्जुन चव्हाण, अध्यक्ष – भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्हा हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कामगारांनी संघटित होऊन संघाच्या बळकटीसाठी एकवटण्याचे आवाहन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती वंदना कामठे व श्री. झानेश्वर जाधव, उपाध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश, तसेच श्री. बाळासाहेब भुजबळ, संघटन मंत्री – BMS महाराष्ट्र यांनी संघटनेच्या भूमिकेवर स्पष्ट आणि प्रेरणादायी विचार मांडले.

सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. विवेक ठकार यांनी केले.

— बैठकीतील ठळक निर्णय व विषय:

राज्य व जिल्हास्तरावर वर्धापन दिनाचे विशेष उपक्रम, रॅली, चर्चासत्रे, स्नेहमेळावे आयोजित करणे

कंत्राटी व असंघटित क्षेत्रातील मजुरांसाठी जनजागृती मोहीम

कामगार प्रश्नांवर राज्य व केंद्र सरकारकडे ठोस मागण्यांचे सादरीकरण

सामाजिक उपक्रम व कामगार हित रक्षणासाठी ठोस कृती आराखडा

ही बैठक संघाच्या पुढील कार्यक्रमांसाठी दिशादर्शक ठरली असून, 23 जुलै वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण भारतभर प्रभावी आणि एकात्मिक कार्यक्रम राबवण्याचा निर्धार या बैठकीतून करण्यात आला.


🗞️

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button