आप’ च्या पाठपुराव्यामुळे शाळेला मिळाला शिक्षक!

‘
डॉ. शाम जाधव
बोपोडी पुणे: आज दिनांक १५/७/२०२५ रोजी बोपोडी येथील पतासीबाई छाजेड ई लर्निंग इंग्लिश मीडियम स्कूल बोपोडी येथे मागील वर्षापासून शिक्षकांची कमतरता होती. यासंदर्भात आम आदमी पार्टीने तक्रार आणि नंतर पाठपुरावा केल्यामुळे आता नवीन शिक्षक देण्यात आला आहे. आज आप कार्यकर्ते आणि पालकांनी शाळेमध्ये जाऊन नवीन शिक्षक आणि मुख्याध्यापकांना शुभेच्छा दिल्या.
बोपोडी मधील या शाळेमध्ये मागील वर्षातील नर्सरी मधील ४० मुलांचे प्रवेश यंदा पहिली मध्ये झाले,परंतु शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे २५ पालकांनी मुलांचे दाखले काढून घेतले होते. या पालकांनी आम आदमी पार्टी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी या संदर्भात प्राथमिक शिक्षण विभाग, मनपा पुणे यांच्याकडे तक्रार आणि पाठपुरावा केल्यानंतर आता नवीन शिक्षक नेमण्यात आले आहेत. यामुळे काही पालक पुन्हा शाळेत मुलांचा प्रवेश करणार आहेत. आम आदमी पार्टीच्या महिला आघाडी उपाध्यक्ष ऍनी अनिश, शिक्षक आघाडीच्या अध्यक्ष शितल कांडेलकर , विकास चव्हाण, शंकर थोरात व पालकांनी मनपा उपायुक्त विजयकुमार थोरात यांची भेट घेतली होती. आता नवीन शिक्षक शनिवारी शाळेत रुजू होताच शाळेत पालक सभा पार पडली.

गरीब वस्तीतील पालकांची मुले या शाळांमध्ये प्रवेश घेण्यास उत्सुक असतानाही शिक्षक नसल्याकारणामुळे हे पालक नाईलाजाने खाजगी शाळांकडे वळत आहेत. याबाबत पालिकेने तातडीने पुरेसे शिक्षक द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. यावेळेस आप चे शीतल कांडेलकर, ऍनी अनिश, विकास चव्हाण तसेच मुकुंद किर्दत ,सुदर्शन जगदाळे, आकाश मुनियन, पालक सविता शिंदे, विलास मोरे आदी उपस्थित होते.