इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि २७/०७/२०२५,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण ०५ शके १९४७
दिनांक :- २७/०७/२०२५,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०५,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति २२:४३,
नक्षत्र :- मघा समाप्ति १६:२३,
योग :- वरीयान समाप्ति २७:१३,
करण :- तैतिल समाप्ति १०:३७,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – पुष्य,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- संध्या. ०५:२७ ते ०७:०५ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२१ ते १०:५८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५८ ते १२:३६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:१३ ते ०३:५० पर्यंत,

❀ दिन विशेष:
यमघंट १६:२३ प., दर रविवारी गभस्ति सूर्याचे मौनाने पूजन करावे,
————-

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण ०५ शके १९४७
दिनांक = २७/०७/२०२५
वार = भानुवासरे(रविवार)

मेष
विद्यार्थ्यांना चांगला काल. महिला वर्ग खुश राहील. जवळच्या व्यक्तीच्या वागण्याने मन दुखावेल. इच्छा नसताना एखादे काम करावे लागू शकते. जोडीदाराची कृती खटकू शकते.

वृषभ
योग्य तर्क करावा लागेल. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. गुंतवणूक लाभदायक ठरेल. योग्य मूल्यमापन करावे. अति अपेक्षा ठेऊ नका.

मिथुन
मानसिक समाधान लाभेल. स्वत:ला बंधनात अडकवू नका. दिवसाची सुरुवात आनंदात होईल. आर्थिक बाजू बळकट करावी. एकाच गोष्टीचे अनेक अर्थ निघू शकतात.

कर्क
देणी-घेणी मिटतील. दिवस आळसात जाईल. अति विचार करण्यात वेळ वाया घालवाल. घराबाहेर वावरतांना योग्य काळजी घ्यावी. हट्टीपणा सोडावा लागेल.

सिंह
छंद जपण्यासाठी वेळ काढावा. दिवस अनुकूल राहील. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे. कामावर अधिक लक्ष केन्द्रित करावे.

कन्या
तडकाफडकी निर्णय घेऊ नका. शेजारधर्म पळवा लागेल. वादाचा मुद्दा जिंकाल. कशाचाही गैरफायदा घेऊ नका. मित्रांचा सल्ला लाभदायक ठरेल.

तूळ
प्रबळ इच्छेवर कामे होतील. उधार-उसनवार नको. प्रेरणा प्रामाणिक हवी. नियोजित वेळेवर केलेली कामे फळाला येतील. औद्योगिक व्यवहारात चोख रहा.

वृश्चिक
कायदेशीर सल्ला घ्यावा. घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. कामे ठरल्याप्रमाणे होतील याकडे लक्ष द्या. मुलांचा विचार समजून घ्या. प्रलंबित येणी मिळू शकतील.

धनू
मोठे व्यवहार करताना सावधान. अफवांवर विश्वास ठेऊ नका. परिस्थितीत सुधारणा होईल. मन विचलित होऊ देऊ नका. जोडीदाराविषयी गैरसमज टाळा.

मकर
प्रलंबित गाठी घेता येतील. अचूक माहिती मिळवावी. बौद्धिक क्षमता वाढीस लावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. जवळचा प्रवास पुढे ढकलावा.

कुंभ
जुने वाद उकरून काढू नका. मैत्रीत वादाची शक्यता. पूर्व नियोजित कामे करावीत. मनात अकारण चिंता निर्माण होऊ देऊ नका. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका.

मीन
घराचे व्यवहार मार्गी लावावेत. मनाची चंचलता वाढेल. फार कडक धोरण घेऊ नका. आततायीपणे कृती करू नका. बहुतांश गोष्टी काळावर सोडाव्यात.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button