सामाजिकसोलापूर

दिवाळीत सोलापूरला …..’बोम्मारील्लू’ सजवा !स्पर्धा

.

श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन
व पद्मशाली सखी संघम चा पुढाकार

सोलापूर : येथील पूर्व भागात दिवाळीला लहान मुली ‘बोम्मारील्लू’ मध्ये (भातुकलीचा खेळ) आवर्जून रमतात. लहान मुलींच्या खेळणीतील स्वयंपाकघर आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ, आकर्षक लहान भांडी, आधुनिक साधने, सामाजिक प्रबोधनपर सजावटीद्वारे ‘बोम्मारील्लू’ सजविला जातो. एकप्रकारे भावी कौटुंबिक व सामाजिक जीवनाचे दायित्व लहानपणीचा हा ‘बोम्मारील्लू’ संस्कार उपयोगी ठरतो. पाहुणचार ‘बोम्मारील्लू’साठी बनवलेल्या दिवाळीचा पदार्थ घरी आलेल्या पाहुण्यांना खायला हमखास देतात. यामुळे लहान मुलींचे कौतुकाचा विषय होतो.

आजच्या काळात कुटुंबे विभक्त होत असताना ही संस्कृती लोप पावते का.? कौटुंबिक संस्कृती, संस्कार, परंपरा, चालीरिती आणि वारसा याची जपणूक पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी, सक्षम कुटूंब आणि सामाजिक जीवन यशस्वीपणे जगण्यासाठी ‘बोम्मारील्लू’द्वारे सामाजिक संदेश देण्यात यावे, म्हणून सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघम तर्फे ‘आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपणच जपूया’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘बोम्मारील्लू’ सजवा.. बक्षीसे मिळवा.! ही स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे, असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा व सखी संघम’च्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा यांनी दिली

या स्पर्धेसाठी नियम पुढीलप्रमाणे आहेत –
॰ ‘बोम्मारील्लू’चे फोटो पाठवून त्यासोबत मोबाईल नंबरसह पत्ता पाठवणे आवश्यक आहे.
॰ परीक्षक फोटो पाहून किंवा गरज वाटल्यास प्रत्यक्षात भेट देतील.
॰ ‘बोम्मारील्लू सजावटी’ सोबत सामाजिक संदेश देण्यात यावे.
॰ परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
प्रथम क्रमांक‘लेडीज घड्याळ’ – श्री. श्रीधर सुरा – सदस्य – अखिल भारत पद्मशाली अन्नसत्रम (यादगिरीगुट्टा – यादाद्री) यांच्या वतीने
द्वितीय क्रमांक‘ट्रव्हल बॅग’ – सौ. शोभा मधुकर अल्ले यांच्या तर्फे
तृतीय क्रमांक‘इस्त्री’
सौ. राधिका दत्तू पोसा (माजी नगरसेविका) यांच्या कडून
‘उत्तेजनार्थ बक्षीसे’ – एकूण 3 बक्षीसे असून सखी फॅशन कॉर्नर तर्फे प्रो. मनोज पिस्के यांच्या वतीने ‘आकर्षक गिफ्ट’. फोटो पाठवण्याची अंतिम तारीख शुक्रवार दि. २४ ऑक्टोंबर असून विनामूल्य (नि:शुल्क) आहे. 9021551431 या व्हाटस्ॲप क्रमांकावर पाठवावेत. ‘परिक्षांचा निर्णय अंतिम राहील. याची नोंद घ्यावी’.
—————————


‘पद्मशाली सखी संघम’ तर्फे
रविवार दि. २६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘हेअर स्टाईल’ (केशरचना) कार्यशाळा…
महिलांना प्रत्येक सणासुदीला आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सजन्याची भारी हौस असते. त्यासाठी ‘हेअर स्टाईल’ सुध्दा (केशरचना) अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ‘माफक फी’ असून यामध्ये ‘पाच प्रकारांचे हेअर स्टाईल’ ब्युटिशियन अश्विनी संगा – कुरापाटी या कर्णिक नगर, यल्ललिंग मठ जवळील ‘सुवि सभागृह’ येथे शिकवणार आहेत. अधिक माहितीसाठी +917385283012 या क्रमांकावर संपर्क साधावेत. आणि दोन्ही कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन
फाउंडेशनचे प्रेसिडेंट लक्ष्मण दोंतूल, उपाध्यक्ष- श्रीनिवास कामूर्ती – नागेश पासकंटी – नागेश सरगम, सल्लागार सुकुमार सिध्दम – दयानंद कोंडाबत्तीनी, श्रीनिवास रच्चा, समन्वयक किशोर व्यंकटगिरी, श्रीनिवास पोटाबत्ती, वैकुंठम् जडल सखी संघम’चे उपाध्यक्षा कु. लक्ष्मी यनगंदूल, सचिवा कु. रुचिरा मासम, कार्याध्यक्षा सविता येदूर, सहसचिव वनिता सुरम – अंजली वलसा – श्रावणी कनकट्टी, खजिनदार गीता भूदत्त, सहखजिनदार हेमा मैलारी, समन्वयिका सुनीता निलम (क्यामा) – पल्लवी संगा – ममता तलकोकूल, कार्यकारिणी सदस्या सुलोचना माचरला, मंजुळा दुधगुंडी, संगीता सिद्राल, सुप्रिया मासम, लता जन्नू, रजनी दुस्सा, प्रियंका अडगटला, लावण्या मच्छा, पुर्णिमा कंदीकटला, अमृता सो. रच्चा यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button