न्यायालयीन थकीत वेतनासाठी शिक्षण संचालक कार्यालय, पुणे येथे शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन.

अकोले प्रतिनिधी
न्यायालयीन आदेशानुसार थकित वेतन देण्यात होत असलेल्या विलंबा विरोधात शिक्षक भारती संघटनेच्या विना अनुदानित कृती समितीच्या वतीने आज पुणे येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी राज्यातील धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक भारती संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“न्यायालयीन थकीत वेतन द्या,शिक्षकांना न्याय द्या!” या घोषणांनी परिसर दुमदुमला.न्यायालयीन आदेशानुसार सर्व शिक्षकांचे थकित वेतन व C.H.B. शिक्षकांचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावे.अशी शिक्षक भारती संघटनेची ठाम भुमिका होती. अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.

यानुसार प्रशासन अधिकारी अनंत दाणी यांनी “एक महिन्याच्या आत थकित बिल मंजूर केले जाईल” असे आश्वासन दिले तसेच विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही नमूद केले.
जयवंत भाबड (राज्याध्यक्ष, विना अनुदानित कृती समिती)
प्रा. महेश पाडेकर (पुणे विभाग कार्याध्यक्ष) प्रा. रामराव काळे (जिल्हाध्यक्ष, अहमदनगर) रूपालीताई कुरुमकर (अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षा) शाहू बाबर (सोलापूर जिल्हाध्यक्ष) सतीश ठाकरे (धुळे जिल्हा शिक्षक नेते) राजीव शिरसाठ (पुणे जिल्हा कार्याध्यक्ष) तसेच जिल्हा उपाध्यक्ष संजय तमनर, सचिन जासूद, दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, संघटक चंद्रशेखर हासे, सहसचिव राहुल कानवडे, तालुका अध्यक्ष सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, साई थोरात, पदाधिकारी संपत वाळके, नानासाहेब खराडे, रूपालीताई बोरुडे, कल्पना चौधरी, मफीज इनामदार, दीपक फापाळे, गणपत धुमाळ, विजय पांडे, अमोल तळेकर, संतोष नवले, बाबासाहेब तांबे, अकील फकीर, बाबाजी लाळगे, वैभव चोथे, प्रवीण मालुंजकर, श्याम जगताप, भोजने,रामदास मुर्तडक, शिवाजी बुरके, सोपान कोरडे,सुरेश वाकचौरे,बाबासाहेब पोखरकर,सतीश ठाकरे,वाळुंज सर, गंगाराम साबळे,जोरावर सर, मुख्याध्यापक संघाचे अकोले तालुकाध्यक्ष सुनील धुमाळ ,मुख्याध्यापक सचिन वाकचौरे, गणेश फटांगरे, संजय उकिरडे ,जगदिश अकलाडे,उमेश घरटे,अनिल शिंदे,नंदू बागुल, चेतन राजपूत,सुदाम चौधरी,पराग चौधरी, मनोहर पवार,सतीश ठाकरे, संतोष चौधरी आदीं उपस्थित होते