शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी 50 हजाराची मदत द्या अन्यथा आमदारांच्या घरावर मोर्चा काढण्याचा वंचितचा इशारा

अकोले प्रतिनिधी
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी 50 हजाराची मदत द्यावी अन्यथा काळी दिवाळी साजरी करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षताई रुपवते यांनी दिला आहे
पाऊस जरी थांबला असेल तरी त्या संकटांनी झालेला नुकसान इतकं प्रचंड आहे की त्या बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू अजूनही थांबलेले नाहीत इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले जमिनीचं नुकसान पिकांचं नुकसान जनावरांचा नुकसान आणि घर मालमत्तेचे नुकसान अशा प्रकारचा एक महाप्रलय कधीच महाराष्ट्राने बघितला नव्हता
राज्य सरकार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी एक चांगला निधी उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा होती पण निधी उपलब्ध करून दिला नाही मात्र आधीच्या योजना आहेत त्याला नवीन नवीन काहीतरी नाव देऊन योजनांच्या घोषणा केल्या जातात शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्य केले जात आहे
दिवाळीच्या तोंडावरती सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची थेट मदत करावी यासाठी वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या बाजूने मैदानात उतरले आहे
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचित चे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर मधील पाथर्डी येथील लोकप्रतिनिधी मोनिकाताई राजळे यांच्या कार्यालयावरती मोर्चा काढला
तशाच प्रकारचे मोर्चे या पुढच्या काळात जे सत्तेतील लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या कार्यालयावरती मोर्चा काढला जाईल जर दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना थेट मदत मिळाली नाही तर अशाच प्रकारचे मोर्चे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराच्या
घरासमोर वंचितचे हे मोर्चे निघतील की असा इशारा उत्कर्षताई रुपवते यांनी दिला आहे


