इतर

अकोल्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आर. पी. आय. ची तिसरी आघाडी ?

अकोले प्रतिनिधी.

अकोले तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक मध्ये यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षांच्या वतीने सर्व जागांवर उमेदवार देण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी दिली

याबाबत माहिती देताना ते म्हणाले की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय समाज कल्याण मंत्री खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्यात आर पी आय पक्ष महायुती सोबत आहे मात्र स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही आरपीआयचे नेते विजयराव वाकचौरे. यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे असंख्य कार्यकर्ते अकोले तालुक्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहे आहे मात्र या कार्यकर्त्यांची सत्ताधाऱ्यांकडून नेहमीच अवहेलना होत आली आहे सत्तेत सहभागी असताना देखील आरपीआय पक्ष कार्यकर्त्यांची अवहेलना होते यामुळे स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये विविध राजकीय सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तिसरी आघाडी करून स्वतंत्रपणे लढावे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते विजयराव वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यात आर पी आय पक्ष अनेक सामाजिक आंदोलनात प्रश्नांमध्ये सातत्याने सहभागी होत आहे तालुक्यात आरपीआय पक्ष सातत्याने जनतेसोबत यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये देखील पक्ष पुढे राहिला पाहिजे अशी भावना कार्यकर्त्यांची आहे या भावनेची दखल घेऊन निवडणुकांमध्ये उमेदवार दिले पाहिजे अशी कार्यकर्त्यांची मागणी पुढे येत आहे

समशेरपुर, देवठाण ,राजुर ,कोतुळ, सातेवाडी, धामणगाव आवारी या सहा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 12 गणांमध्ये रिपब्लिकन पक्षाने आंबेडकरी चळवळीतील व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उपेक्षित कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तिसरी आघाडी तयार करून प्रत्येक गट आणि गणामध्ये उमेदवार देण्याचे कार्यकर्त्यांची चाचणी केली जात आहे आदिवासी , सर्वसाधारण, मागासवर्गीय अशा प्रत्येक उमेदवाराची चाचपणी केली जात आहे आंबेडकरी , चळवळीतील कार्यकर्ते,सकल ओबीसी , एन टी एससी एसटी आदिवासी समाजातील घटकांना सोबत घेऊन तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न करत असल्याचे श्री विजय पवार यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button