आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०३/१२/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण १२ शके १९४७
दिनांक :- ०३/१२/२०२५,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५१,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर हेमंतऋतु
मास :- मार्गशीर्ष
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति १२:३६,
नक्षत्र :- भरणी समाप्ति १८:००,
योग :- परीघ समाप्ति २६:५७,
करण :- गरज समाप्ति २२:३४,
चंद्र राशि :- मेष,
रविराशि – नक्षत्र :- वृश्चिक – ज्येष्ठा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०६प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:१९ ते ०१:४२ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:४८ ते ०८:१० पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०८:१० ते ०९:३३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५६ ते १२:१९ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०४:२८ ते ०५:५१ पर्यंत,
❀ दिन विशेष:
त्रयोदशी – चतुर्दशी श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण १२ शके १९४७
दिनांक = ०३/१२/२०२५
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
आजचा दिवस आळसात जाईल. जोडीदारासोबत पुढील गोष्टींचे नियोजन कराल. महिला थोडा हात आखडता घेऊन वागतील. वेळेचा सदुपयोग कराल. जास्त विचार करत बसू नका.
वृषभ
मानसिक चिंता सतावेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. कामात जरासा सुस्तपणा जाणवेल. गोडीने सर्वांना जिंकून घ्यावे. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील.
मिथुन
मुलांना काही नवीन गोष्टी शिकवाल; त्यांच्या सोबत वेळ घालवून मस्त वाटेल. विद्यार्थी वर्ग खुश असेल. प्रिय व्यक्ति सोबत फिरायला जाल. हाताखालील लोक चोख काम करतील.
कर्क
आईचा सहवास लाभेल. जोडीदारासोबत फिरायला जाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. दिवस समाधानात जाईल.
सिंह
काल्पनिक जगात रमून जाल. मित्रांसमोर मनातील गोष्टी बोलून दाखवाल. तरुण वर्ग आळसात दिवस घालवेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. भावंडांमधील सामंजस्य वाढीस लागेल.
कन्या
एकाच वेळी अनेक कामे अंगावर घ्याल. घरातील लोकांसोबत फिरायला जाण्याचा बेत आखाल. बोलण्यात गोडवा ठेवाल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. छोटासा घरगुती कार्यक्रम होईल.
तूळ
तुमच्यातील सर्जनशीलता वाढीस लागेल. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या कामात रस घ्याल. आवडते पुस्तक वाचनात येईल. दिवस आनंदात जाईल.
वृश्चिक
आध्यात्मिक बाबतीत रुचि वाढेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. परदेशी कंपनीत काम करणार्यांना दिवस फलदायी असेल. वैचारिक शांतता जपावी.
धनू
आजचा दिवस आनंदी असेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. थोरांचा सल्ला मिळेल. व्यवसायिकांना चांगला लाभ होईल. जवळचे मित्र भेटतील.
मकर
कामात अति घाई करू नका. शांततेचा मार्ग अंगिकारावा. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल. आपली क्षमता सुधारण्यावर भर द्यावा. नवीन गोष्टी शिकण्याकडे अधिक प्राधान्य द्यावे.
कुंभ
जुनी कामे तडीस जातील. दानधर्म करता येईल. धार्मिक कामात सहभाग नोंदवाल. कोर्टाशी संबंधित कामे पुढे सरकतील. सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल.
मीन
गूढ शास्त्रात रस घ्याल. उच्च शिक्षण घेणार्यांना फायदा होईल. पोटाच्या तक्रारी संभवतात.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर




