रणंद बु.(ता. अकोले) येथे समृद्ध किसान प्रकल्पा अंतर्गत ग्राहक सेवा केंद्राचे उदघाटन!

एस के जाधव /महादर्पण प्रतिनिधी
रणद बुद्रुक (ता. अकोले), २ डिसेंबर २०२५ —
ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई पुरस्कृत आणि बायफ (BISLD), नाशिक संचलित समृद्ध किसान प्रकल्पा अंतर्गत रणद बुद्रुक येथे ग्राहक सेवा केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमास ए.एस.के. फाऊंडेशनचे मॅनेजर श्री. अरुण बांबळे, बायफचे श्री. राम कोतवाल, श्री. विष्णु चोखंडे, श्री. निलेश आलवणे, गावचे सरपंच श्री. सुंदरलाल भोईर तसेच मोठादेव ग्रामविकास समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
समृद्ध किसान प्रकल्पाच्या माध्यमातून सचिन बाळू पटेकर यांना लॅपटॉप व प्रिंटर देण्यात आला.
या ग्राहक सेवा केंद्रामुळे शेतकऱ्यांना आता गावातच विविध सेवा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये सातबारा उतारे, आधार कार्ड दुरुस्ती, महा-डीबीटी योजनांचे अर्ज भरणे, झेरॉक्स, फोटो काढणे, नवीन आधार कार्ड बनवणे, पॅन कार्ड प्रक्रिया, बँकिंग कामकाज, जात प्रमाणपत्र, नोकरीसाठी अर्ज भरणे, KYC अपडेट, पीक पाहणी अशा अनेक सेवा एका छताखाली मिळणार आहेत. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांचा वेळ व पैसा वाचणार आहे.

रणद खुर्द आणि रणद बुद्रुक येथील शेतकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन ए.एस.के. फाऊंडेशनचे श्री. सिद्धार्थ अय्यर तसेच बायफचे श्री. प्रदीप खोसे व श्री. सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मोठादेव ग्रामविकास समिती व बायफचे श्री. मारुती सगभोर आणि काजल देशमुख यांनी कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला



