अकोले तालुक्यातील पट्टेवाडी येथे घराला भीषण आग.

घरासह संसार उपयोगी साहित्य जळून खाक.
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील पट्टेवाडी येथील चिंधू संतू गोडे राहणार पट्टेवाडी (शिवाजीनगर ) येथील रहिवाशी असून त्यांच्या घराला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.या आगीत घरासह संसार उपयोगी वस्तू तसेच धान्य जळून खाक झाले आहे.सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीत हानी नाही.रात्रीच्या सुमारास ही आग लागल्याने त्यांच्या घरात त्यांचे कुटुंब रहात होते.
रात्रीच्या वेळी त्यांच्या घरातील एका व्यक्तीला अचानक जाग आल्याने त्यांना आग लागताना दिसली.स्थानिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली.आगीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने तो पर्यंत होत्याच नव्हत झालं होते.
चिंधू संतू गोडे त्याचे कुटुंब त्या घरात वास्तव करत होते.ग्राम महसूल अधिकारी जालिंदर घाणे तसेच सरपंच गावातील ग्रामस्थांनी पाहणी केली असता घरावरील १५ सिमेंट पत्रे,सागवाणी घर,घरातील धान्य तसेच संसार उपयुक्त साहित्य असे एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचे साहित्य आगीत जळून नुकसान झाले आहे.आगिचे कारण मात्र अध्यापही अस्पष्ट आहे.शासनाने या कुटुंबीयाला आर्थिक मदत तसेच घर व संसार उपयुक्त साहित्य देण्यात यावे असे तेथील स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.




