बोधेगाव येथे उमेद कात्रण चिकटवही स्पर्धेचा निकाल जाहीर; १८ जानेवारीला बक्षीस वितरण

प्रमोद कातकडे
बोधेगाव दि 17 शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील उमेद वाचनालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उमेद कात्रण चिकटवही स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
या स्पर्धेत विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली कलात्मकता सादर केली. बोधेगाव व बोधेगाव परिसरातील जवळपास २५ शाळेच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला.
यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची गटानुसार नावे खालील प्रमाणे
इयत्ता पहिली ते चौथी गटात
प्रथम क्रमांक चैतन्य शहाराम आगळे (जि.प.प्रा.शाळा काळेगाव),द्वितीय क्रमांक क्षितिजा अतुल बडे (जि.प.प्रा शाळा बालंबिका नगर),तृतीय क्रमांक ऋषिकेश अभिमन्यू नालांडे (जि.प.प्रा शाळा शोभा नगर) यांनी पटकावला.
उत्तेजनार्थ
स्वरा संदीप दसपुते (जि.प.प्रा शाळा एक गुरुजी),ईश्वरी महेश गरुड (जि.प.प्रा शाळा बाडगव्हाण) व ईश्वरी राजेंद्र इंगोले (जि.प.प्रा शाळा बोधेगाव) यांची निवड झाली.
इयत्ता पाचवी ते आठवी गटात
प्रथम क्रमांक अर्णव अभिमन्यू शिरसाठ (आदर्श विद्यालय बीड),द्वितीय क्रमांक पल्लवी भाऊसाहेब जऱ्हाड (जि.प.प्रा शाळा चेडे चांदगाव),तृतीय क्रमांक श्रावणी सुनील सोलट (मुंगादेवी विद्यालय,मुंगी)
उत्तेजनार्थ
रिया माया सोनवणे ( जि.प.प्रा शाळा बालमटाकळी),ईश्वरी संदीप कातकडे (श्री.शिवाजी हायस्कूल बोधेगाव) व शेख अक्सा समीर (मुंगादेवी विद्यालय मुंगी) यांची निवड झाली.
इयत्ता नववी ते बारावी गटात
प्रथम क्रमांक जयश्री ज्ञानदेव घोरतळे (श्री.शिवाजी हायस्कूल बोधेगाव),द्वितीय क्रमांक यश अशोक थोरात (कै.विमलबाई गंगाधर गायकवाड माध्यमिक विद्यालय,गायकवाड जळगाव),तृतीय क्रमांक सायली मदन घुगे (श्री.शिवाजी हायस्कूल बोधेगाव) यांनी यश संपादन केले.
उत्तेजनार्थ
प्राजक्ता नानासाहेब अंतरकर,(कै.विमलबाई गंगाधर गायकवाड माध्यमिक विद्यालय,गायकवाड जळगाव),तनुजा बाळासाहेब केसभट (कै.विमलबाई गंगाधर गायकवाड माध्यमिक विद्यालय,गायकवाड जळगाव) व दिव्या निलेश राजे भोसले (मुंगादेवी हायस्कूल, मुंगी) यांची निवड झाली.
खुल्या गटात
प्रथम क्रमांक अर्चना सखाराम पठारे (जि.प.प्रा.शाळा ठाकूर निमगाव),द्वितीय क्रमांक बबीता राजेंद्र पालम (जि.प.प्रा.शाळा गायकवाड जळगाव),तृतीय वैशाली रामदास वाघमारे (जालना)
उत्तेजनार्थ
मनीषा नवनाथ गोर्डे,अनुष्का लक्ष्मी लड्डा (परभणी) व भारती भाऊसाहेब राजगुरू (जि.प.प्रा. शाळा लाडजळगाव) यांची निवड झाली.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक १८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता उमेद वाचनालय, बोधेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड, गटशिक्षणाधिकारी शैलेजा राऊळ,डॉ.शंकर गाडेकर, दिगंबर वाघमारे,गोरक्षनाथ दातीर,दत्तात्रय केसभट व प्रमोद कातकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.उमेद वाचनालयाचे सर्व वाचक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



