भंडारदरा येथे राष्ट्रीय सेवा योजना व बायफ अंतर्गत स्वच्छता अभियान!

प्रतिनिधी /एस के जाधव
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे, कला व वाणिज्य महाविद्यालय शेंडी (भंडारदरा डॅम) राष्ट्रीय सेवा योजना व ए.एस.के फाउंडेशन मुंबई पुरस्कृत व बायफ नाशिक संचलित समृद्ध किसान प्रकल्प अकोले अंतर्गत स्वच्छता अभियान भंडारदरा गावात उत्साहात राबविण्यात आले.
या अभियानात मा.प्रभारी प्राचार्य सुनील मालुंजकर व ए.एस.के. फाउंडेशनचे श्री.सिद्धार्थ अय्यर व श्री.अरुण बांबळे तसेच बायफचे श्री. प्रदीप खोसे व श्री. सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष तारगे, रा.से.यो.सहकार्यक्रम अधिकारी प्रा. जगन धनगर, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.मीनाक्षी भगत, विद्यार्थीनी प्रतिनिधी माया मोहरे, विद्यार्थी प्रतिनिधी निरंकर कोरडे, प्रा.त्रिंबक बांडे, प्रा.सुनिल आवारी, प्रा.आनंदा धनगर, प्रा.अंकुश फोडसे, प्रा .यशवंत शेळके, प्रा.भाऊराव भागडे , प्रा.सोमनाथ गभाले, प्रा.चंद्रकांत मंडलिक, प्रा.सुप्रिया हासे श्री.मनोहर भांगरे ,श्री.योगेश मधे तसेच बायफ संस्थेचे श्री.राम कोतवाल, श्री.विष्णु चोखंडे, श्री.निलेश आलवने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. धोंडू मुंढे, सरपंच सौ.अनिता खाडे, उपसरपंच श्री.गंगाराम इदे, श्री. मारुती सगभोर, काजल देशमुख, तसेच गावातील नागरीक व रा.से.योजना स्वयंसेवकांनी परिसरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर तसेच परिसरातील नाले व मोकळी जागा स्वच्छ केली.

कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली. यावेळी प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून त्याचे योग्य विल्हेवाटीकरण करण्यात आले. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवकांनी घोषवाक्ये देत स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्वच्छता अभियानाचे उद्देश,
स्वच्छता व आरोग्य यांचे महत्त्व समाजात रुजविणे. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करणे.
विद्यार्थी व स्वयंसेवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करणे.प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम समजावून सांगणे व त्याचा वापर कमी करण्यास प्रोत्साहन देणे. स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण करून रोगराईपासून संरक्षण करणे.
स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविणे.
स्वच्छतेविषयी शिस्त,सवय व सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे. केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता विषयक उपक्रम राबविणे. शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यावर भर देणे. युवकांमध्ये स्वच्छता,आरोग्य व पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे. प्लास्टिकमुक्त व कचरामुक्त परिसर निर्माण करण्यासाठी जनसहभाग वाढविणे. ग्रामीण व शहरी भागात स्वच्छतेविषयी शाश्वत सवयी विकसित करणे. स्वयंसेवकांच्या माध्यमातून सामाजिक विकास व राष्ट्रीय बांधिलकी जोपासणे. तसेच उपस्थित विद्यार्थी यांना बायफचे श्री.राम कोतवाल यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करणे, प्रयत्नवादी राहणे, सातत्य ठेवणे, ध्येय गाठण्यासाठी नियोजन करणे, ध्येय निश्चित केले पाहिजे, कौशल्य विकसित केले पाहिजे, नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळले पाहिजे, चांगले शिक्षण घेऊन चांगले अधिकारी बनले पाहिजे, चांगले आदर्श शेतकरी तयार झाले पाहिजे, शाश्वत उत्पन्नासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडारदरा मुख्याध्यापक श्री.धोंडू मुंढे सर यांनी विद्यार्थी यांना शिक्षण घेत असताना त्यात प्रशिक्षणाची भर देणे, त्यामुळे आपल्या कुठलेही क्षेत्रात उतरणे सोपे जाते, चांगल्या गोष्टी आत्मसात करणे आवश्यक आहे, शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे, ध्येय पूर्ती साठी चिकाटी, जिद्द महत्त्वाची आहे यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष तारगे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा.सुनिल आवारी सर यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी स्वयंसेवक व गावातील महिला, पुरुष उपस्थित होते.



