स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा राजुर येथे सत्कार संपन्न

आदिवासी समाज कृती समिती चा पुढाकार
विलास तुपे
राजूर/प्रतिनिधी
आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र, शाखा अकोले व माजी विद्यार्थी आश्रम शाळा मवेशी यांचे संयुक्त विद्यमाने ॲड. देशमुख महाविद्यालय राजूर येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग व सरळ सेवा महाराष्ट्र शासन परीक्षेत उत्तीर्ण झालेले गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंधु भांगरे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.नितीन तळपाडे, (सिनेट सदस्य सोलापूर) प्रा डॉ.विजय हीले, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. किरण लहामटे , आदिवासी समाजसेवक रामनाथ भोजने, निवृत्त मुख्याध्यापक बी.के घोडे यांचे उपस्थित पार पडला. यावेळी प्रा नितीन तळपाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजच्या आधुनिक , स्पर्धात्मक आदिवासी विद्यार्थी एम.पी.एस.सी द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये उत्तुंग यश संपादन करत आहेत ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे.
या विद्यार्थ्यांनी आपल्या मिळालेल्या संधीचे सोने करून, समाजहित डोळ्यासमोर ठेवून आपला पुढचा प्रवास करावा व येणाऱ्या पिढीला योग्य मार्गदर्शन करावे.तर आ.लहामटे यांनी आदिवासी समाज जगातील सर्वात जुना असून त्यांना मूळ निवासी समजले जाते . तसेच सहनशील आणि तेव्हढाच प्रामाणिक आहे. जिद्द व चिकाटी असल्यास कोणत्याही शाखेत प्रवेश मिळाला तरी संधीच सोनं करता येत . स्पर्धा परीक्षेची तयारी दहावी पासूनच तयारी करावी असेही म्हटले . यावेळी आ. किरण लहामटे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी सचिव रमेश हीले कार्याध्यक्ष कोंडीराम पोपेरे, नामदेव भांगरे,शिवराम भांडकोळी, विठ्ठल जोशी, बाजीराव वाळेकर यमाजी भांगरे ,सौ .सिंधू भांगरे, रामभाऊ रोंगटे, निंबा भांगरे,देशमुख सर , गंगाराम सांगडे , किसन भोजने , सुदाम चपटे , मारुती पडवळे , सुरेश गोडे , आदी सह सर्व पदाधिकारी परिश्रम घेतले . प्रस्ताविक निवृत्त मुख्याध्यापक बी.के घोडे यांनी केले तर सूत्रसंचालन समाजसेवक भास्कराव येलमामे. यांनी केले. आभार कृती समितीचे अध्यक्ष चिंधु भांगरे यांनी यांनी मानले



