आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२०/०१/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ३० शके १९४७
दिनांक :- २०/०१/२०२६,
वार :- भौमवासरे(मंगळवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०६,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:१५,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- द्वितीया समाप्ति २६:४३,
नक्षत्र :- श्रवण समप्ति १३:०७,
योग :- सिद्धि समाप्ति २०:०१,
करण :- बालव समाप्ति १४:३२,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- मकर – उतराषाढ़ा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:२८ ते ०४:५१ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ११:१७ ते १२:४० पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:४० ते ०२:०४ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:२८ ते ०४:५१ पर्यंत,
❀ दिन विशेष:
धर्मबीज, चंद्रदर्शन (१९:५५ प.), मु. ३०, साम्यार्घ,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ३० शके १९४७
दिनांक = २०/०१/२०२६
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
कौटुंबिक खर्च वाढू शकतो. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. फार चिंता करू नये. प्रेमसंबंधातील गैरसमजूतीला मनात थारा देवू नका. संभाषणाची आवड पूर्ण कराल.
वृषभ
उत्तम परीक्षण कराल. प्रकाशनाच्या कामात यश मिळेल. चिंतन, मनन कराल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. सामाजिक वजन वाढेल.
मिथुन
व्यावसायिक लाभ मनाजोगा होईल. वडिलांचे चांगले सहकार्य लाभेल. गोड बोलून कामे साध्य कराल.तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. एकाच गोष्टीवर लक्ष द्यावे.
कर्क
सर्वांशी नम्रतेने वागाल. हातातील कामात यश येईल. उपासनेची आवड पूर्ण कराल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. श्रद्धेवर अधिक भर द्याल.
सिंह
आरोग्याची काळजी घ्यावी. खोट्या गोष्टींच्या मागे लागू नका. मोहात अडकू नका. चुकीचे विचार मनातून काढून टाकावेत. उत्साहाने कामे कराल.
कन्या
जुन्या कामात पुन्हा लक्ष घालावे लागेल. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतात. खर्चाकडे लक्ष द्यावे. दिवस मनाजोगा घालवाल. कामातील बदल जाणून घ्यावेत.
तूळ
विश्वासू लोकांकडून कामे होतील. नातेवाईकांचा गोतावळा जमेल. इतरांच्या वागण्याचा फार विचर करू नये. कौटुंबिक सौख्यावर भर द्याल. योग्य संधीचा लाभ घ्यावा.
वृश्चिक
आपल्याकडील ज्ञान इतरांना द्याल. स्त्रीदाक्षिण्य दाखवाल. चेष्टा, विनोद यात दिवस घालवाल. तुमचा अंदाज बरोबर येईल. पैज जिंकता येईल.
धनू
तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींवरच फक्त लक्ष द्याल. मन:शांती लाभेल. आत्मिक आनंद लाभेल. मोठ्यांचा आशिर्वाद मिळेल. घरातील वातावरण आनंदी असेल.
मकर
जवळचा प्रवास मजेत होईल. स्मरणशक्तीच्या जोरावर कामे कराल. सर्वांशी आपलेपणाने वागाल. मनाची चंचलता दूर करावी. आवडते पुस्तक वाचाल.
कुंभ
नातलगांना आर्थिक मदत कराल. योग्य गोष्टींचा पाठपुरावा कराल. गोड पदार्थ चाखाल. आवडीबाबत आग्रही राहाल. सर्वांशी गोड बोलाल.
मीन
आर्थिक बाबींकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे. फसवणुकीपासून सावध राहावे. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्यातील समंजसपणा दिसून येईल. सर्वांना आपलेसे कराल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



