इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२१/०१/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ ०१ शके १९४७
दिनांक :- २१/०१/२०२६,
वार :- सौम्यवासरे(बुधवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०६,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:१६,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति २६:४८,
नक्षत्र :- धनिष्ठा समप्ति १३:५८,
योग :- व्यतीपात समाप्ति १८:२८,
करण :- तैतिल समाप्ति १४:४८,
चंद्र राशि :- कुंभ,
रविराशि – नक्षत्र :- मकर – उतराषाढ़ा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०७नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी १२:४१ ते ०२:०४ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:०६ ते ०८:२९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०८:२९ ते ०९:५३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ११:१७ ते १२:४१ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०४:५२ ते ०६:१६ पर्यंत,

❀ दिन विशेष:
भा. माघ मासारंभ, दग्ध २६:४८ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ ०१ शके १९४७
दिनांक = २१/०१/२०२६
वार = सौम्यवासरे(बुधवार)

मेष
सर्वांशी मनमिळावूपणे वागाल. चांगले वाहन लाभेल. प्रगतीला चांगला वाव मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वाची चांगली छाप पडेल. सर्वांचे लक्ष वेधून घ्याल.

वृषभ
फार काळजी करू नये. झोपेची तक्रार मिटेल. भावंडाना प्रवास करावा लागेल. मनाचे चांचल्य दूर सारावे. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यावा.

मिथुन
सांपत्तिक स्थिती सुधारेल. अत्यंत लाघवीपणे बोलाल. हसत-खेळत दिवस घालवाल. कामाचा ओघ वाढेल. घेतलेल्या परिश्रमाचे चीज होईल.

कर्क
आपले विचार योग्यरीतीने मांडाल. पित्तविकाराचा त्रास जाणवू शकतो. टीकेला बळी पडू नका. काटकसरीने वागावे. संगत तपासून पहावी.

सिंह
उत्साहाच्या भरात कामे हाती घ्याल. कार्यप्रविणता वाढेल. हट्टीपणा करून चालणार नाही. वैवाहिक सौख्यात बहर येईल. कामात दिरंगाई येवू शकते.

कन्या
सामाजिक वादात लक्ष घालू नये. झोपेच्या तक्रारीकडे लक्ष द्यावे. एकावेळी एकाच कामावर लक्ष द्या. निराशा दूर सारावी. पायाचे विकार जाणवतील.

तूळ
अधिकारी व्यक्तींच्या ओळखी होतील. मनातील अपेक्षा पूर्ण करता येतील. वाहन विषयक कामे होतील. कौटुंबिक समाधानात रमाल. व्यावसायिक वाढीचा विचार कराल.

वृश्चिक
कामात सकारात्मक बदल घडतील. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. कलेतून आर्थिक प्रगती होईल. वाहनाचे काम पार पडेल. तुमचा मान वाढेल.

धनू
वरिष्ठांशी मतभेद वाढवू नयेत. आपले स्थान जपण्याचा प्रयत्न करावा. प्रवास करावा लागेल. वडिलधाऱ्यांच्या विरोधाला समजून घ्यावे. मानसिक ताणाला बळी पडू नका.

मकर
अकारण आलेली निराशा बाजूला सारावी. एकाच गोष्टीत अडकून राहू नका. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. कौटुंबिक सुखाला प्राधान्य द्याल. कामानिमित्त दूर गावी लागेल.

कुंभ
पत्नीचे कौतुक कराल. किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. एकमेकांबद्दलची ओढ वाढेल. तुमच्यातील वैचारिक बदल जाणून घ्यावा. बैठे खेळ खेळाल.

मीन
आरोग्यात सुधारणा होईल. हातातील कामे पूर्ण होतील. मानसिक शांतता लाभेल. गोड पदार्थ खायला मिळतील. जुनी कामे निघतील.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button